आहुर्ली : घोटी शहरातील काही भागामध्ये पथदीप बंद असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पथदीप तत्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वीस बंगला, जनता हायस्कूल परिसर, बसस्थानक परिसर, सप्तशृंगी नगर, संभाजीनगर, इंदिरानगर, प्रचित राया बाबा रोड व परिसरातील पथदिवे बंद आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असून, पोलीस स्टेशनही याच हद्दीत येते. याशिवाय बसस्थानकामुळे प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते. मात्र पथदीप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पथदीप तत्काळ सुरू करण्याची मागणी कचरू मराडे, भावराव जाधव, कैलास भोर, दिलीप बारगजे, दशरथ परदेशी, माधव गतीर, सईद रंगरेज, गजानन लहाने, शिवाजी मांडे, शरद येलमामे, कांतीलाल श्रीश्रीमाळ, समीर ठाकूर आदिंसह नागरिकांनी केली आहे.
पथदीप बंद असल्याने गैरसोय
By admin | Updated: October 3, 2014 00:30 IST