शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचारी वसाहतीत गढूळ पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: May 7, 2017 00:33 IST

नाशिक : जुने नाशिक परिसरातील ५४ क्वॉर्टर्स या पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जुने नाशिक परिसरातील ५४ क्वॉर्टर्स या पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर मनपाने टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.जुने नाशिकमध्ये ५४ क्वार्टर्स ही पालिका कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. सुमारे ६५० कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परिसरात माती व गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे. संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर महापालिकेने पाण्याचा टॅँकर सुरू केला आहे. परंतु, अद्याप गढूळ पाण्याचा पुरवठा थांबलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील ड्रेनेज लाईन फुटून त्याचे पाणी पिण्याच्या पाइपलाइनमध्ये पाझरत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. परंतु, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला मात्र अद्याप समस्या सोडविण्यात यश आलेले नाही. काही लोकांच्या घरांमध्ये घाण पाणी घुसत असल्याच्याही तक्रारी आहेत. महापालिकेने तातडीने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा व टॅँकरची संख्या वाढवावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.