शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २७ पोलिसांना महासंचालक पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत ७९९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत ७९९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मान पदके जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील २७ पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस उपनिरीक्षकांना गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल, तर प्रत्येकी एक पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कामगिरीसाठी पदक जाहीर झाले आहे, तर नाशिक शहर पोलीस दलातील ५ पोलीस हवालदार, पाच पोलीस नाईक आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक सुनील गोसावींसह पाच जणांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पदक जाहीर झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिनी पोलीस आयुक्तालयातील पोलीस कवायत मैदानावर होणारा पोलीस महासंचालक पदक प्रदान सोहळा रद्द करण्यात आला होता.

शहरातील १०, तर ग्रामीणच्या ६ जणांना पदक

नाशिक शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार सुगन बटन साबरे, पोलीस हवालदार गुलाब प्रभाकर सोनार, संतोष दत्तात्रय वाणी, यशवंत बबन खंदारे, वसंत धर्माजी पांडव, पोलीस नाईक गणेश साहेबराव निंबाळकर, प्रशांत धोंडीराम वालझाडे, मिलिंद फकिरा निकम, भूषणसिंग उदयसिंग चंदेल, प्रीती नितीन कातकाडे यांना १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे, तर नाशिक ग्रामीण दलातील पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन सुखदेव आवारी व सुनील वसावे यांना गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध केलेली कारवाईबद्दल पदक जाहीर झाले, तर नाशिक ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शंकर तेलुरे, मोहम्मद नजीम अब्दुल रहेमान शेख आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंबादास चनबसू जाडर, पोलीस नाईक मनोज विश्वनाथ गोसावी यांना १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.

पीटीएच्या ६, तर एसीबीच्या तिघांचा समावेश

महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक सुनील देवगीर गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम पांडुरंग पाटील, पोलीस हवालदार प्रकाश रुपचंद राठोड, मनिलाल महारु पवार, पोलीस नाईक गणेश महादेव काकड, शिवाजी भुजंग ठेंग यांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक निवृत्ती तुंगार, पोलीस हवालदार दिलीप शामराव कांबळे, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिकचे पोलीस नाईक रज्जाक अली युनूस अली सैय्यद नागरी हक्क संरक्षण विभाग, नाशिकचे पोलीस हवालदार संजीवकुमार काशी माथुर, पोलीस नाईक सुरेशसिंग छगनसिंग परदेशी यांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.