शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

दिशादर्शक फलक झाडांच्या आड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:20 IST

शहरात नव्याने येणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे.

नाशिक : शहरात नव्याने येणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. त्यामुळे कुठला मार्ग कोठे जातो हे सुद्धा फलकांवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे, तर काही प्रवासी भररस्त्यातच आपले वाहने थांबवत फलक वाचण्याचा प्रयत्न करत आहे.प्रवाशांना रस्ता माहीत नसल्यावर कुणालातरी विचारत आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होत असते. त्यात मोठ्या शहरांमध्ये अनेकांची वेगवेगळ्या मार्गांमुळे फसगत होत असते. त्यामुळे चुकीने प्रवासी एखाद्या वेगळ्याच ठिकाणी पोहचत असतो. त्यामुळे शहारामध्ये नव्याने येणाºया प्रवाशांना कुठला मार्ग कोठे जातो व कुठून जातो हे कळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील प्रत्येक मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र हे फलक रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या बेसुमार वाढलेल्या फांद्यामुळे झाकाळले गेले आहे. त्यामुळे या फलकांवर मार्गाच्या माहितीविषयी काहीच दिसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांची एकप्रकारची दिशाभूलच होत आहे. शहरातील मुख्य भागांत असलेल्या या फलकांनाच झाडांच्या फांद्यांनी झाक ळले असल्यामुळे याचा फटका प्रवाशांना होताना दिसतो. त्यामुळे पालिकेने अशा फलकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.झाडांची बेसुमार वाढशहरातील मुख्य रस्ता असलेला जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील पिनॅकल मॉल, त्र्यंबकनाका भागातील फलकांना मार्गाच्या कडेला असलेल्या झाडांची बेसुमार वाढ झालेली आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्यामुळे येथील दिशादर्शक फलक झाकाळले गेले आहे. तसेच सारडा सर्कल, गंगापूररोड, पंपिंगरोड भागांतील फलकांची दुरवस्था झाली आहे. याचा फटका शहरात नव्याने येणाºया प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे अशा फलकांची सुधारणा व बेसुमार वाढलेल्या झाडांची तोड करणे गरजेचे आहे.त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी शहरातून एकमेव मार्ग असल्याचे माहीत होते.पालिकेने अशा फलकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र शहरात येण्याचा फारसा प्रसंग येत नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाणारा मुख्य मार्ग माहीत नव्हता त्यात त्र्यंबकरोड नाक्यावर आल्यावर येथील फलक व्यवस्थित न दिसल्यामुळे चुकीने गर्दीच्या मार्गाने जावे लागले. त्यामुळे रिक्षाचालकाला विचारत पुन्हा फिरून मुख्य मार्गाला यावे लागले.- नितीन पाटाळे, प्रवासी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी