शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शक फलक गेले झाडांच्या आड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:27 IST

शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. त्यामुळे कुठला मार्ग कोठे जातो हे सुद्धा फलकांवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांची दिशाभुल होत आहे. तर काही प्रवासी भररस्त्यातच आपले वाहने थांबवत फलक वाचण्याचा प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देशहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहेप्रवाशांची एकप्रकारची दिशाभुलच होत आहे.पिनॅकल मॉल, त्र्यंबकनाका भागातील फलकांना मार्गाच्या कडेला असलेल्या झाडांची बेसुमार वाढ

नाशिक : शहरात नव्याने येणाºया प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिकाप्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रत्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. त्यामुळे कुठला मार्ग कोठे जातो हे सुद्धा फलकांवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांची दिशाभुल होत आहे. तर काही प्रवासी भररस्त्यातच आपले वाहने थांबवत फलक वाचण्याचा प्रयत्न करत आहे.प्रवाशांना रस्ता माहित नसल्यावर कुणालातरी विचारत आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होत असते. त्यात मोठ्या शहरांमध्ये अनेकांची वेगवेगळ्या मार्गांमुळे फसगत होत असते. त्यामुळे चुकीने प्रवासी एखाद्या वेगळयाच ठिकाणी पोहचत असतो. त्यामुळे शहारामध्ये नव्याने येणाºया प्रवाशांना कुठला मार्ग कोठे जातो व कुठुन जातो हे कळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील प्रत्येक मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र हे फलक रस्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या बेसुमार वाढलेल्या फांद्यामुळे झाकाळले गेले आहे. त्यामुळे या फलकांवर मार्गाच्या माहितीविषयी काहीच दिसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांची एकप्रकारची दिशाभुलच होत आहे. शहरातील मुख्य भागांत असलेल्या या फलकांनाच झाडांच्या फांद्यांनी झाक ळले असल्यामुळे याचा फटका प्रवाशांना होतांना दिसतो. त्यामुळे पालिकेने अशा फलकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे जेणेक रुन शहरात नव्याने येणाºया प्रवाशांची गैरसोय होणार नाही.झाडांची बेसुमार वाढशहरातील मुख्य रस्ता असलेला जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील पिनॅकल मॉल, त्र्यंबकनाका भागातील फलकांना मार्गाच्या कडेला असलेल्या झाडांची बेसुमार वाढ झालेली आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्यामुळे येथील दिशादर्शक फलक झाकाळले गेले आहे. तसेच सारडा सर्कल, गंगापुर रोड, पंपिंग रोड भागांतील फलकांची दुरवस्था झाली आहे. याचा फटका शहरात नव्याने येणाºया प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे अशा फलकांची सुधारणा व बेसुमार वाढलेल्या झाडांची तोड करणे गरजेचे आहे.त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी शहरातून एकमेव मार्ग असल्याचे माहित होते. मात्र शहरात येण्याचा फारसा प्रसंग येत नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाणारा मुख्य मार्ग माहित नव्हता त्यात त्र्यंबकरोड नाक्यावर आल्यावर येथील फलक व्यवस्थित न दिसल्यामुळे चुकीने गर्दीच्या मार्गाने जावे लागले. त्यामुळे रिक्षाचालकाला विचारत पुन्हा फिरुन मुख्य मार्गाला यावे लागले.नितीन पाटाळे, प्रवासी 

 

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा