शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीकरांना कोविड रुग्णालयाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 18:46 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाचे बस्तान मोठ्या प्रमाणावर असल्याने व विशेष असे कोविड रुग्णालय तालुक्यात उपलब्ध नसल्याने दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील रग्णांची होमक्वॉरंटाइनला पसंती

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाचे बस्तान मोठ्या प्रमाणावर असल्याने व विशेष असे कोविड रुग्णालय तालुक्यात उपलब्ध नसल्याने दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.सध्या दिंडोरी तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने त्यांचा परिणाम जनतेवर होत आहे. काही ठिकाणी मिनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे दिलासा मिळत आहे. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता व रग्णांची संख्या लक्षात घेता दिंडोरीकरांना विशेष असे कोविड रुग्णालय नसल्याने जनतेमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील पेशंट रुग्णालयात जाण्यासाठी टाळाटाळ करताना दिसत आहेत. त्याचे मुख्य कारण रुग्णालयात गेले तर कुठलीही सोय मिळत नाही. त्यामुळे घरी राहून योग्य उपचार घेतलेले बरे असे येथील लोकांचे मत असल्यामुळे विविध ठिकाणी अनेक रुग्ण होम क्वॉरंटाइनला पसंती देत आहेत.मिनी लॉकडाऊनचा प्रभावसध्या शासनाने मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केल्याने त्याचा प्रभाव दिंडोरी तालुक्यातील विविध भागात पहायला मिळत आहे. जनतेने जर असाच प्रतिसाद दाखविला तर कोरोनावर सहज मात करता येईल, असे विचार ग्रामीण भागातून ऐकायला मिळत आहे. जनतेने आता सावध होऊन व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून आपण व आपले कुटुंब कोरोनापासून सुरक्षित राहील. असे दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी सुजित कोशिरे यांनी सांगितले.दिंडोरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासन याकामी भरपूर प्रयत्नशील आहे. परंतु सध्या ग्रामीण भागातील रुग्णांना काही ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. या गोष्टी घडू नये यासाठी शासनाने ठोस भूमिका घेऊन तालुक्याच्या ठिकाणी सर्व सुविधा असणारे कोविड रुग्णालय स्थापन करावे.- योगेश बर्डे, उपसरपंच, म्हेळुस्के, ता. दिंडोरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल