शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात नदी-नाल्यांना पूर

By admin | Updated: July 10, 2016 23:04 IST

बाजारकरूंची गैरसोय : शहरातील मुख्य रस्ता झाला जलमय, वाहतूक विस्कळीत

 दिंडोरी : दिंडोरी शहरासह तालुक्यात शनिवार रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून सर्व नदी, नाल्यांना पूर आला आहे. सर्व धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान रविवार सकाळी आठपासून पुन्हा जोरदार पाऊस होत अवघ्या सात तासात दिंडोरी शहरात विक्रमी ११० मिमी पाऊस झाला असून सारा तालुका जलमय झाला आहे.शनिवार रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून रविवारी सकाळपासून पुन्हा तुफान पाऊस सुरू असून सर्व नदी, नाले यांना पूर आला असून सर्व धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. दिंडोरी शहरातून जाणाऱ्या धामण नदीला मोठा पूर आला. हनुमान मंदिरापर्यंत पाणी पोहोचले. काही दुकाने, घरांमध्ये पाणी शिरले.दुपारी नाशिक कळवण रस्त्यावर रणतळे परिसरात तुफान पाऊस झाल्याने रणतळे येथे पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर पाणी येत या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, तर वलखेड ननाशी बाऱ्हे रस्त्यावर चारोसाजवळ कादवा नदीला तर घाटाळबारी येथे पार नदीला मोठा पूर येत पुलावरून पाणी वाहत असल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पश्चिम भागात अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता.येवला मनमाड येथील पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने शुक्रवारपासून वाघाड व करंजवण धरणातून पालखेड धरणात पाणी सोडले होते; मात्र पालखेडच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून सर्व नदी-नाले यांना पूर आला होता पूर पाण्यात येवला साठी पाणी पुरणार असून प्रशासनाने वाघाड व करंजवणचा विसर्ग थांबविण्यात आला. वाघाड करंजवणमधून पालखेड मध्ये आवर्तन सोडल्याने कादवा कोलवन नदीकाठच्या गावांचा पाणी चोरी होऊ नये म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.(वार्ताहर)