शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 19:31 IST

दिंडोरी : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून पावसाचे आगमनाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.

ठळक मुद्देपश्चिम भागातील धरणांचे पाणलोट क्षेत्रात मात्र अल्प पाऊस झाल्याने अद्याप धरण पाणीसाठा जैसे थे

दिंडोरी : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून पावसाचे आगमनाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.दिंडोरी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पेरण्या खोळंबल्या होत्या व झालेल्या पेरण्या व भाजीपाला लागवड पावसाअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र शुक्र वारी (दि.१९) सायंकाळी व रात्री खेडगाव कादवा कारखाना मातेरेवाडी, लोखंडेवाडी, जोपुळ, जानोरी, मोहाडी तळेगाव, खतवड दिंडोरी भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र पावसाचे माहेरघर समजल्या जाणाºया पश्चिम भागातील धरणांचे पाणलोट क्षेत्रात मात्र अल्प पाऊस झाल्याने अद्याप धरण पाणीसाठा जैसे थे आहे.पूर्व भागात विविध ओहोळ, नाल्यांना पूर आला तरी शनिवारी (दि.२०) निळवंडी पाडे, हातनोरे, मडकीजांब जंबुटके परिसरात चांगला पाऊस झाल्याने कोळवन व धामण नदीलाही पूर आल्याने पालखेड धरणात पाणीसाठा वाढत आहे.शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली पुन्हा एक दोन तासाने ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. जोपुळ, धामणवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने धामणवाडी येथील ओहोळाला मोठा पूर आला. त्यामुळे जोपुळ पिंपळगाव रस्त्यावर पाणी आले, परिणामी बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान येथे पुलाची आवश्यकता असताना फरशी करण्यात आल्याने रस्त्यावर पाणी आले आहे.या पावसाने जोपुळ येथील पाझरतलावात चांगले पाणी साचले असून, दिंडोरी शहरात निळवंडी रोडवर जुन्या पंचायत समिती प्रवेशद्वारापुढे देखिल पाणीच पाणी झाले आहे.रस्त्याची गुणवत्ता उघडदिंडोरी, पालखेड, लोखंडेवाडी, जोपुळ, पिंपळगाव तसेच लखमापूर, कादवा कारखाना, खेडगाव रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण झाले. मात्र सदर रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तक्र ारी होत्या. त्यातच काही ठिकाणी सिलकोट करणे बाकी राहिल्याने सदर रस्ता पावसात उखडून गेला असून पुन्हा खड्डे पडू लागले आहे.जोपुळ पिंपळगाव रस्त्यावर धामणवाडी येथे यापूर्वी अनेकवेळा रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे रस्ता नूतनीकरण होताना पूल होणे गरजेचे होते मात्र बांधकाम विभागाने येथे पुला ऐवजी फरशी टाकत छोटे पाईप टाकले.त्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावर आले व जनतेला त्रास होत असून रस्त्याचेही नुकसान झाले आहे. येथे पूल होणे गरजेचे आहे.- महेंद्र पगार, धामणवाडी.