शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

पंचवीस वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांची "दिल दोस्ती दुनियादारी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:33 IST

पॉझिटिव्ह स्टोरी जानोरी : सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाची अवघड परिस्थिती असूनही माणुसकी व मैत्रीची भावना टिकून आहे, याचा प्रत्यय ...

ठळक मुद्देमोहाडी : कोरोना पीडित मित्राला केली लाखमोलाची मदत

पॉझिटिव्ह स्टोरीजानोरी : सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाची अवघड परिस्थिती असूनही माणुसकी व मैत्रीची भावना टिकून आहे, याचा प्रत्यय मोहाडी (ता. दिंडोरी) येथील मित्रांनी केलेल्या लाखमोलाच्या मदतीतून गावकऱ्यांना आला. या वर्गमित्रांची ही दिल दोस्ती दुनियादारी पाहून ग्रामस्थांनीही मैत्रीचे कौतुक केले.मोहाडी येथील चंद्रकांत अहिरे यांना व त्यांच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली. अहिरे हे विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक म्हणून देवळाली येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. त्यामुळे पुरेसा पगार नाही व घरची परिस्थितीही बेताचीच. या परिस्थितीत ते नाशिक येथील कोविड सेंटरला दाखल झाले. तेथे त्यांनी चार दिवस उपचार घेतले. परंतु तेथे पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने तिथून हलविणे गरजेचे होते. ही बाब त्यांचे सन १९९५ च्या दहावीच्या बॅचचे वर्गमित्र असणाऱ्या ह्यके.आर.टी.मोहाडीह्ण या व्हॉट्सॲप ग्रुपवर समजली. तेव्हा वर्गमित्र पुढे सरसावले व त्यांनी सर्वांनी अहिरे यांना त्यांचा स्वाभिमान न दुखवता मदत करण्याचे ठरविले.

बघता बघता एकाच दिवसात फोन पे च्या माध्यमातून लाखाच्या वरती रक्कम जमा झाली. त्यात शेतकरी, व्यावसायिक व नोकरदार वर्गमित्रांबरोबरच सासरी गेलेल्या वर्ग मैत्रिणींनीही आपला मोठा सहभाग नोंदविला. नंतर मित्रांनी त्यांना इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे ठरविले. परंतु ऑक्सिजन बेडची आवश्यकता असल्याने ते बेड मिळू शकत नव्हते.

शेवटी वर्गमित्रांनी अहिरे यांची आरोग्यविषयक परिस्थिती जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांच्या कानी घातली. परंतु ऑक्सिजन बेड उपलब्धतेची कठीण परिस्थिती असतांनाही पवार यांनी दाखल करून घेण्याची तयारी दाखविली. त्या अगोदरच दुर्दैवाने अहिरे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे अहिरे व त्यांच्या आईला उपचारार्थ दाखल करण्यात आले.

त्यानंतर गेले सहा दिवस वर्गमित्रांनी कुटुंबातील सदस्यासारखे रेमडेसिविर इंजेक्शन्स व इतर मेडिसिन,जेवणाच्या डब्यासह उर्वरित रोख रक्कम दिली. अहिरे यांच्या अडचणीच्या काळात सर्व प्रकारची मदत करून वर्गमित्र व त्याच्या कुटुंबाला लाख मोलाची मदत केली.ग्रामस्थांकडून कौतुकअहिरे यांचे दहावीचे वर्गमित्र डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे शिक्षण अधिकारी डॉ. नानासाहेब पाटील, वैभव पाटील, शंकर ठाकूर,शरद झोमण, सुनील मौले, दिगंबर शेळके, सतीश देशमुख यांनी आर्थिक मदतीबरोबरच आपला जीव धोक्यात घालून कुटुंबातील सदस्यासारखी पूर्ण कालावधीत प्रत्यक्ष मदत केली. आता अहिरे व त्यांच्या मातोश्री पूर्ण बरे होऊन घरी आले आहेत. विद्यार्थ्यांनी पंचवीस वर्षांपूर्वीची आठवण ठेवून आपल्या अडचणीत आलेल्या मित्राला मदत केली त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.