शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

डेकाटे अखेर जिल्हा परिषदेत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:14 IST

जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी पदावरील वादावर अखेर पडदा पडला असून, प्रशासनावर मात करीत डॉ. विजय देकाटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. गेल्या महिनाभरापासून देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेकडून चालढकल केली जात होती.

नाशिक : जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी पदावरील वादावर अखेर पडदा पडला असून, प्रशासनावर मात करीत डॉ. विजय देकाटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. गेल्या महिनाभरापासून देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेकडून चालढकल केली जात होती.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची भंडारा येथे बदली झाली तर त्यांच्या जागी डॉ. विजय देकाटे यांना शासनाने नियुक्ती दिली होती. या काळात डॉ. वाघचौरे हे रजेवर असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केलेले नव्हते. त्यामुळे डॉ. देकाटे हे ४ जून रोजी जिल्हा परिषदेत सूत्रे घेण्यासाठी आले असता त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी रुजू करून घेतले नाही.  बदलीचे आदेश येऊनही डॉ. वाघचौरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर दावा सांगितला होता, तर डॉ. देकाटे यांनाही रुजू करून घेतले जात नव्हते. यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. नाशिक जिल्ह्णात कुपोषणासारख्या महत्त्वाच्या विषयावर मोठे काम सुरू असताना तसेच दूषित पाण्याचे नमुने आढळल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालेला असताना मुख्य कार्यकारी अधिकारी तत्काळ निर्णय घेत नसल्यामुळे त्यांच्याविषयीच्यादेखील चर्चा या काळात चांगल्याच रंगल्या. बदलीच्या या खेळात गिते यांच्यावर राजकीय दबाव आल्याचीदेखील चर्चा झाली, तर आरोग्य विभागाच्या सचिवांनीदेखील याप्रकरणी तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याने अखेर डॉ. देकाटे यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती.दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हेदेखील रजेवर असल्यामुळे याप्रकरणी काय निर्णय होतो या मॅटच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शनिवार, दि. ३० रोजी या प्रकरणाची सुनावणी होती. तत्पूर्वी दि. २७ रोजी सचिवांनी जिल्हा परिषदेला पत्र देऊन डॉ. देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबतचे पत्र दिले होते. त्यानुसर देकाटे हे शुक्रवारी रुजू होत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.प्रशासन तोंडघशीपुणे येथील कुटुंब कल्याण सहायक संचालक पदावरून जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बदली होऊन आलेले डॉ.विजय देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून चालढकल केली जात होती.वारंवार आश्वासने देऊनही त्यांना प्रत्यक्षात दाखल करून घेतले जात नव्हते अखेर देकाटे यांनी थेटशासनाच्या आदेशाचा आधार घेत जिल्हा आरोग्य अधिकारीपदाच्या खुर्चीचा ताबा घेतला. विशेष म्हणजे कर्मचारी वर्गाने त्यांचे जोरदार स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अनुपस्थितीत देकाटे यांनी चार्ज मिळविल्याने देकाटे प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन तोंडघशी पडले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद