शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

दिगंबरच्या खालशांचा वाद मिटला

By admin | Updated: August 27, 2015 00:13 IST

दिगंबर आखाडा बैठक : महंत गंगादास यांची मध्यस्थी

पंचवटी : मागील तीन दिवसांपासून दिगंबर आखाड्याने बहिष्कृत केलेले तीन खालसे व आखाडा यांच्यात चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून रंगलेल्या वादाला दिगंबर आखाड्याच्या महंत व बहिष्कृत केलेल्या खालशाच्या महंतांनी अखेर पूर्णविराम दिल्याने आखाडा व खालशांत सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दिगंबर आखाड्यात झालेल्या महंत व बहिष्कृत खालशाचे महंत यांच्यात वाद मिटविण्यासाठी नेमण्यात आलेल्या ११ जणांच्या समितीच्या माध्यमातून हा वाद मिटविण्यात आला. त्यानंतर बहिष्कृत केलेल्या खालशाचे महंत व दिगंबर आखाड्यांच्या महंतांनी जय सीताराम, हनुमानाचा जयघोष करीत एकमेकांची गळाभेट घेऊन आपापसातील मतभेद विसरून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दिगंबर आखाडा जगन्नाथपुरीचे महंत गंगादास यांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा पडला आहे. चतु:संप्रदायच्या ध्वजावरून, तसेच महंतांचा अपमान केल्याच्या कारणावरून दिगंबर आखाड्याचे महंत व खालसे यांच्यात वाद निर्माण झाला होता. याच वादातून दिगंबर आखाड्याच्या महंतांनी बैठक घेऊन महात्यागी कॅम्पच्या महंत सीतारामदास, डाकोरचे महंत माधवाचार्य व तेराभाई त्यागीचे महंत बृजमोहनदास यांच्या खालशांवर बहिष्कार टाकत त्यांना शाहीस्नानाला बरोबर न नेण्याची भूमिका घेतली होती. आखाडा व खालशाचे महंत यापैकी कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याने दिवसेंदिवस वाद वाढतच चालला होता. आखाडा व बहिष्कृत खालशांचे वाद मिटावे, यासाठी बुधवारी सकाळी दिगंबर आखाड्यात बैठक घेण्यात येऊन ११ खालशांच्या सदस्यांची समिती नेमण्यात आली व त्या समितीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारी दिगंबर आखाड्याचे महंत कृष्णदास, महंत रामकिशोरदासशास्त्री, जगन्नाथपुरीचे महंत गंगादास, भक्तिचरणदास तसेच बहिष्कृत केलेल्या खालशांचे महंत बृजमोहनदास, माधवाचार्य व रामदासत्यागी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी आखाडा व खालशांच्या महंतांनी आपापसातील वाद चव्हाट्यावर आणू नयेत, जे झाले ते झाले आता वाद होणार नाही, अशी भूमिका घेत हनुमानाचा जयघोष करीत वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले. काही चुकांमुळे गैरसमज होऊन वाद निर्माण झाले होते; मात्र यापुढे असे होणार नाही असे गंगादास यांनी सांगितले. वाद मिटविण्यासाठी सनकादिकाचार्य, माधोदास, रामभूषणदास, रामस्वरूपदास, लक्ष्मणदास, रघुवंशभूषण, गोकुळदास, गणेशदास, प्रभुदास, अखलेश्वर आदि महंतांची समिती स्थापन करण्यात आली होती. (वार्ताहर)