शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन केंद्रास खोडा

By admin | Updated: November 30, 2015 23:06 IST

दिरंगाई : नोकर भरतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पडून; अग्निशमन केंद्र बंदच

भगूर:नगरपालिकेने ५० लाख रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी उभारलेल्या अग्निशमन केंद्राकरिता जिल्हा प्रशासनाकडे अधिकारी-कर्मचारी भरतीचा पाठवलेला प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून असल्याने केवळ कर्मचारी नसल्यामुळे अग्निशमन केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे नगरपालिकेचे लाखो रुपये वाया जात असून, अग्निशमन केंद्र बंद अवस्थेत पडून आहे.भगूर गावात आग लागल्यास किंवा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास छावणी परिषद, साऊथ एअरफोर्स, देवळाली, नाशिकरोड अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते. संबंधित अग्निशमन दलाचे बंब येण्यास वेळ लागत असल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढण्याची शक्यता असते. मात्र या संवेदनशील प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने भगूरकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. भगूर नगरपालिकेने अग्निशमन केंद्राचे महत्त्व लक्षात घेऊन २०१३ मध्ये १८ लाख रुपये खर्च करून अग्निशमन बंब खरेदी केला. तसेच ३४ लाख रुपये खर्च करून मोठ्या गणपती मंदिराजवळ अग्निशमन सेवा केंद्र व कामगारांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली. आग विझविण्यासाठी व आपत्कालीन परिस्थितीत लागणारे सर्व साहित्यदेखील खरेदी करण्यात आले आहे. नगरपालिकेने रहिवाशांच्या घरपट्टीमध्ये अग्निशमन करही समाविष्ट करून वसुली सुरू केली आहे.भगूर नगरपालिकेत अग्निशमन केंद्र व इतर विभागाची १७ ते १८ पदे रिक्त असून, वर्षभरापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे नगरपालिकेने कामगार भरतीचा प्रस्ताव पाठविला आहे. अग्निशमन केंद्रासाठी १ अधीक्षक, चालक व चार फायरमन अशा सहा जागांची भरती करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून वारंवार तारीख पे तारीख देत नोकर भरतीचा प्रस्ताव रेटून नेला जात आहे. अशी परिस्थिती केवळ भगूर नगरपालिकेबाबतची नव्हे तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसंदर्भात असल्याचेदेखील समजते. त्र्यंबक पालिकेने पाठविलेल्या कामगार भरतीचा प्रस्ताव रेंगाळलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडे भगूर नगरपालिकेच्या कामगार भरतीचा प्रस्तावदेखील धूळखात पडून असल्याने ५० लाख रुपये खर्च करून उभारलेले अग्निशमन केंद्र व बंब हे एक प्रकारे शोभेची वस्तू ठरली आहे. नगरपालिकेने जिल्हा प्रशासनाकडे वर्षभरात अनेकवेळा नोकरभरतीच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही नोकरीभरती प्रस्तावाच्या फाईलवरील धूळ ‘जैसे थे’च आहे. भगूर पालिकेला आदर्श नगरपालिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर पालिकेसाठी अग्निशमन केंद्र असावे असा विचार पुढे आला आणि त्यासाठीची महाराष्ट्र शासनाकडून तरतूदही करण्यात आली. सुमारे ८० लाख निधी मिळाल्यानंतर युद्धपातळीवर अग्निशमन इमारतीचे काम आणि वाहन खरेदी करण्यात आली. मात्र सर्व सज्जता असतानाही केवळ मनुष्यबळ नसल्याने अग्निशमन केंद्र असून नसल्यासारखे आहे.