शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयचे प्रवेशअर्ज भरण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:03 IST

नाशिक : सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन रजिस्ट्रेशन करून अर्ज निश्चित करताना संकेतस्थळाच्या धीम्या गतीमुळे अडचणी येत असून, अर्ज भरता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर कॅफेच्या फेºया मारावा लागत आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास संस्थेत संपर्क साधण्याचे आवाहन

नाशिक : सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन रजिस्ट्रेशन करून अर्ज निश्चित करताना संकेतस्थळाच्या धीम्या गतीमुळे अडचणी येत असून, अर्ज भरता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर कॅफेच्या फेºया मारावा लागत आहेत.आयटीआय प्रवेशाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या सुरू झाली असून, यावर्षी विविध २७ व्यवसाय अभ्यासक्र माच्या ६२ तुकड्यांमधील एक हजार ३०२ जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. परंतु, प्रवेशप्रक्रियेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवत असल्याने विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन क रून अर्ज निश्चित करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या प्रामुख्याने दुपारच्या वेळी जाणवत असून, सकाळी व सायंकाळी अर्ज भरणाºया विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने संकतस्थळ सुरळीत चालते. संकेतस्थळाची अडचणी आल्यानंतर काही वेळानंतर प्रयत्न करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन आयटीआयतर्फे करण्यात आले आहे.माहितीसाठी स्वतंत्र कक्ष विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची माहिती देण्यासाठी संस्थेत स्वतंत्र विभागाची व्यवस्था करण्यात आली असून आॅनलाइन प्रवेशाची माहिती, अर्ज कसा भरावा, कॅप राउंड, प्रवेश निश्चिती याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असून, विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास संस्थेत संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य सुभाष कदम यांनी केले आहे.