शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पेट्रोल पंपांवर वेगवेगळे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:28 IST

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असून, संपूर्ण राज्यासह देशभरात या इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळून निघत असताना नाशकात पेट्रोलच्या किमतींनी नव्वदीचा टप्पा पार केला आहे. तर डिझेलचे दर ७७.६३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशाप्रकारे महागाईचा भडका उडालेला असताना नाशिक शहरातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर वेगवेगळे दर आकारून पेट्रोलियम कंपन्या आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देनाशकात महागाईचा भडका पेट्रोल नव्वदी पार; डिझेल ७७ रुपये ६३ पैसे

नामदेव भोर । नाशिक :

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असून, संपूर्ण राज्यासह देशभरात या इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळून निघत असताना नाशकात पेट्रोलच्या किमतींनी नव्वदीचा टप्पा पार केला आहे. तर डिझेलचे दर ७७.६३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशाप्रकारे महागाईचा भडका उडालेला असताना नाशिक शहरातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर वेगवेगळे दर आकारून पेट्रोलियम कंपन्या आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे दिसून आले आहे.पेट्रोलच्या किमतीत तफावतनाशिक शहरातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर इंधनाचे वेगवेगळे दर आकारले जात असल्याने नाशिककरांकडून पेट्रोलच्या दरांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. संकेतस्थळासह पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनकडून जाहीर होणारे दैनंदिन पेट्रोल-डिझेलचे दर आणि प्रत्यक्षात शहरातील विविध पेट्रोल पंपांवर केल्या जाणाऱ्या दर आकारणीमध्ये तफावत आढळून येत आहे. शहरात पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशनने मंगळवारी ८९.९७ रुपये असा दर जाहीर करण्यात आलेला असला तरी शहरातील काही पेट्रोल पंपांवर मात्र नव्वदहून अधिक रुपयांना पेट्रोलची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.दरफलकाचा अभावशहरातील काही पेट्रोल पंपांवर रोज बदलणाºया इंधन दराची ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी ‘दरफलक’ लावलेले पहायला मिळाले.काही पेट्रोल पंपांवर दरफलक लावण्याकडे पेट्रोल पंपचालकांनी काणाडोळा केला आहे.पेट्रोल पंपांच्या पाहणीत असे आढळले...शहरातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवरील किमतीची वास्तविकता जाणून घेण्यासाठी लोकमतने मंगळवारी केलेल्या पाहणीत भारत पेट्रोलियमच्या कॉलेजरोडवरील श्रद्धा पेट्रोल पंप व त्र्यंबकरोडवरील विनोद आॅटोमोबाइल या पेट्रोल पंपावर पेट्रोल ८९ रुपये ९५ पैसे तर डिझेल ७७ रुपये ६१ पैसे दराने विकले जात होते. तर इंडियन आॅइलच्या त्रिमूर्ती चौकातील गोविंदा फ्युएल स्टेशनवर पेट्रोल ८९ रुपये ९० पैसे, तर डिझेल ७७ रुपये ५७ पैसे इतक्या कमी दराने विक्री होत असल्याचे दिसून आले. त्र्यंबकनाका येथील आरके सर्व्हिस गॅरेज या पेट्रोल पंपावर पेट्रोल ८९ रुपये ९९ पैसे तर डिझेल ७७ रुपये ६६ पैसे दराने विकले जात होते. महात्मानगर येथील एस्सार पेट्रोल पंपावर पेट्रोल ८९ रुपये ९९ पैसे दराने विक्री होताना आढळून आले. या पेट्रोल पंपावर कोणताही दरफलक नव्हता. तर सर्वाधिक दर गंगापूररोड भागातील रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर दिसून आले. येथे पेट्रोल ९० रुपये ३ पैसे, डिझेल ७७ रुपये ६४ पैसे दराने विकले जात असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप