शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आहारमासात उपासमारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:36 IST

सरकारी यंत्रणांतील बेफिकिरीचा मुद्दा तर वारंवार चर्चेत येत असतोच; पण त्यांच्या या बेफिकिरीमुळे पुरवठादार अगर ठेकेदारही किती बेगुमान होत चालले आहेत व त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे, याची प्रचिती जिल्हा परिषदेत येत आहे.

ठळक मुद्देकारवाईचे कागदी घोडे नाचविण्यापेक्षा अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी.

सरकारी यंत्रणांतील बेफिकिरीचा मुद्दा तर वारंवार चर्चेत येत असतोच; पण त्यांच्या या बेफिकिरीमुळे पुरवठादार अगर ठेकेदारही किती बेगुमान होत चालले आहेत व त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे, याची प्रचिती जिल्हा परिषदेत येत आहे.खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शिक्षण खात्याकडून पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत खिचडीसाठी तांदुळाचा पुरवठा करण्यात येत असतो. या खिचडीत निकृष्टता असते, अशा तक्रारी आजवर नित्याच्याच ठरल्या होत्या; परंतु आता या खिचडीसाठीचा तांदूळ गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मिळालेलाच नसल्याची ओरड होऊ लागली आहे. हा तांदूळ पुरवठ्यासंबंधातील खर्चाशी निगडित काही मागण्या ठेकेदारांच्या असूही शकतील; परंतु त्याचा निर्णय होत नाही म्हणून शाळा-शाळांना तांदूळ पुरवण्याचेच रोखून धरले जात आहे हे पूर्णत: गैर व अडवणुकीचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार घडून येत असून, त्यामागील शासनाच्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबतची जाणीव जागृती करून देण्यासाठी शासनातर्फे सप्टेंबर महिना हा खास आहारमास म्हणून साजरा केला जात असताना त्यातच जणू अडचणीचा फाल्गुनमास ओढवला आहे. यात संबंधित ठेकेदारांवर काय कारवाई व्हायची ती होईलही, परंतु विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित राहावे लागल्याची जी वेळ निघून गेली आहे तिची भरपाई कशी होणार? आता विलंबाने तांदूळ पुरवठा केला तरी, जे दिवस निघून गेले त्या दिवसांच्या हिशेबाने विद्यार्थ्यांना घरीच तांदूळ देणार का असेही प्रश्न उपस्थित होणारे आहेत. तेव्हा कारवाईचे कागदी घोडे नाचविण्यापेक्षा अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी.