शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलने गाठली नव्वदी, डिझेल ७७.४८ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:48 IST

शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

नाशिक : शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना शहरातील वेगवेगेळ््या पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या दराने पेट्रोल विकले जात आहे.  पेट्रोल वाहतूक खर्चातील तफावतीमुळे हा फरक असला तरी बहुतांश पेट्रोल पंपावर निर्धारित किमती पेक्षा २० ते २५ पैसे अधिक किमतीने पेट्रोल विक्री होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे. नाशिकमध्ये तेल कंपन्यांनी निर्धारित केलेल्या किमतीप्रमाणे रविवारी ८९.७२ रुपये पेट्रोलचे दर असताना काही पेट्रोल पंपावर ८९.९८ रुपये दराने पेट्रोलची विक्री होत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. तसेच ग्राहकांना रोज बदलणाऱ्या किमती माहिती व्हाव्या यासाठी सर्व पेट्रोल पंपचालकांना पेट्रोलचे बदललेले दर दर्शनी भागात लावण्याच्या सूचना असतानाही बहुतांश पेट्रोलपंप चालकांनी अशाप्रकारे फलक लावणे टाळलेले आहे.अनेक पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सहकार्य केले जात नसून ग्राहकांना शंभरच्या पटीत पेट्रोल भरण्यास सांगितले जात असून, लिटरच्या प्रमाणात पेट्रोल भरण्यात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने ग्राहकांकाडून पेट्रोलच्या वाढत्या किमतींवरून सरकारविरोधात रोष पसरत असतानातच वितरण प्रणालीविषयीही ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.ग्राहकांमध्ये संतापसंपूर्ण देशभरात इंधन दरवाढीविरोधात संताप व्यक्त होत असताना नाशिकमध्येही इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. ग्राहकांना पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसह सुमारे २१ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन करीत भारतबंद पुकारल्यानंतरही इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ सुरूच आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून व संघटनांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना सामान्य नाशिककरांकडूनही सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल