शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल चोरणाऱ्या टोळीतील एकास अटक

By admin | Updated: March 7, 2017 23:45 IST

सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर ट्रकमधून डिझेलची चोरी करताना एका संशयितास वावी पोलिसांनी रंगेहात पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन चार जण पसार झाले.

वावी : बोलेरो जीपसह २१ ड्रम व चोरीचे साहित्य जप्तसिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर ट्रकमधून डिझेलची चोरी करताना एका संशयितास वावी पोलिसांनी रंगेहात पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन चार जण पसार झाले. पाथरे शिवारात नाशिक हद्दीलगत नाकाबंदी करण्यात येणाऱ्या ठिकाणी रविवारी पहाटे हा प्रकार घडला.  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकशेजारी बोलेरो जीप (एमएच १५, सीडी ९७५५) उभी करून डिझेल चोरी करण्यात येत होती. यावेळी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनाला पाहून चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी जीपचा पाठलाग सुरू केला. यावेळी जीप एका खड्ड्यात अडकली. टोळीतील पाचही जणांनी उड्या टाकून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील विकी बबन ठमके (१९, रा. गोंदवणी रोड, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरित चार जण पसार झाले. त्याच्याकडून डिझेल चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो जीप, ३५ लिटर क्षमतेचे २१ रिकामे ड्रम, रबरी नळ्या, लोखंडी दांडे, दोरखंड, दगड असे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे, हवालदार कैलास आवारी, हनुमंता कांबळे, संदीप शिंदे, अरुण केदारे, व्ही. एस. खेडकर, पी. टी. उंबरकर, एम. आर. चव्हाण या पोलीस पथकाने सदर कामगिरी केली.  ताब्यात घेतलेल्या संशयितासह अन्य चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर-शिर्डीसह नाशिक-पुणे महामार्गावरही गेल्या अनेक महिन्यांपासून डिझेल चोरीचे प्रकार घडत होते. त्यामुळे अन्य घटनांचाही याच्याशी संबंध आहे काय, याचा पोलीस तपास करीत आहे. (वार्ताहर)