शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

होते नव्हते सारे नेले...

By admin | Updated: August 4, 2016 01:39 IST

पूर ओसरला : व्यावसायिकांचे अतोनात नुकसान

संदीप झिरवाळ पंचवटीकोणाच्या दुकानात पाणी गेले तर कोणाच्या टपऱ्या वाहून गेल्या, काहींचा माल भिजला, तर काही व्यावसायिकांच्या दुकानांचे केवळ सांगाडेच शिल्लक राहिले. गोदामाईला पूर आला आणि होते नव्हते सारे नेले. मंगळवारी (दि. २) गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरल्यानंतर गंगाघाट परिसरात विविध व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या शेकडो व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांकडे धाव घेतली अन् पुरानंतर दुकानांची झालेली परिस्थिती पाहून गोदामाईला हात जोडले. काहींना तर अश्रू अनावर झाले, झाले गेले गंगेला मिळाले म्हणत त्यांनी दुकानात शिल्लक असलेल्या वस्तू बाहेर काढण्याचे काम हाती घेतले होते. गोदावरीला आलेल्या पुरामुळे गंगाघाट परिसरात व्यवसाय करणाऱ्या शेकडो व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गोदावरीला आलेल्या पुराचे पाणी ओसरल्यानंतर बुधवारी सकाळी गंगाघाटावर विविध व्यवसाय करणारे हातगाडीधारक, हॉटेल व्यावसायिक, कपडे दुकानदार, किराणा दुकानदार, देवदेवतांचे फोटो विक्रेते, प्रसाद फूल विक्रेते व अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी दुकानांकडे धाव घेतली आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे चित्र बघून व्यावसायिकांवर जणू आभाळच कोसळले. दुकानातील टेबल, खुर्च्या, कपडे, धान्याचे पोते, गोदामाईच्या पुरात वाहून गेले होते. एवढेच नव्हे तर दुकानात लावलेले देवदेवतांचे फोटोही गोदामाईत वाहून गेल्याने व्यावसायिक हतबल झाले. मंगळवारी आलेल्या पुरामुळे नारोशंकर मंदिराबाहेर असलेले सर्वच दुकानात पाणी शिरले होते, तर मालेगाव स्टॅण्ड उतार, सरदारचौक, कपालेश्वर पोलीस चौकी परिसर, रामसेतू पुलावरील टपऱ्या व गंगाघाट सांडव्यावरची देवी ते रामकुंडापर्यंत असलेल्या सर्वच दुकानांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या दुकानातील वस्तू वाहून गेल्या, तर काहींच्या दुकानात पाच फुटापर्यंत गाळ साचलेला होता. काही दुकानांचे केवळ सांगाडेच शिल्लक होते.