श्याम बागुल ।नाशिक : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत चालली असताना उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार हे दोन जिल्हे मात्र पूर्णत: सेफ झोनमध्ये असून, याठिकाणी एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेला नाही. मात्र नाशिक येथे ७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक डेंजर झोनमध्ये नगर जिल्हा आहे. याठिकाणी तब्बल २५ रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव देशाची डोकेदुखी ठरली असून, त्यापासून बचावासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. असे असतानाही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. उत्तर महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांत सुमारे १३४५ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या नगर जिल्ह्यातील आहे. जवळपास ७६० नमुने तपासण्यात आले, त्यात २५ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पस्ट झाले. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात २५३ नमुने तपासण्यात आले, त्यात ७ कोरोनाबाधित सापडले. तर एकाचा बळी गेला आहे़ जळगाव येथे १३१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, दोघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे दिसून आले. सेफ झोनमध्ये असलेल्या धुळे जिल्ह्यात १०५, तर नंदुरबार येथे ४२ संशयितांचे नमुने तपासले असता, एकही कोरोनाबाधित नसल्याचे दिसून आले. विभागात ११४३ निगेटिव्ह नमुने आले आहेत.विभागात आरोग्य यंत्रणा सज्जउत्तर महाराष्ट्रात ८९ ठिकाणे संशयित रुग्णांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. याठिकाणी जवळपास ११,८५७ लोकांची सोय होऊ शकते. त्याचबरोबर १५ ठिकाणी ७१० रुग्णांची आयसोलेशन करण्याची व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार सेफ झोनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:43 IST
श्याम बागुल । नाशिक : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत चालली असताना उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार हे दोन जिल्हे ...
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार सेफ झोनमध्ये
ठळक मुद्देअहमदनगर डेंजर झोनमध्ये : नाशिक, जळगाव काठावर