नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगरच्या उपसरपंचपदी सोनाली धोंगडे यांची निवड झाली आहे. गेल्या महिन्यात तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. महिन्याभरानंतर उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पडली. ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली. यावेळी उपसरपंचपदासाठी सोनाली धोंगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध घोषित करण्यात आली. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंचाची निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच दत्ता जाधव होते. सभागृहात अॅड. निवृत्ती कातोरे, रखमाबाई मेंगाळ, नंदा कुंदे, सुरेश तारडे, रामदास धोंगडे, राणी जाधव, सुरेखाधोंगडे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप दराडे, सहायक अधिकारी लता हिले यांनी काम पाहिले. याप्रसंगी माजी उपसरपंच धनाजी जाधव, ग्रामस्थ सुखदेव धोंगडे, गणेश दराणे, चंदर पारवे, अशोक धोंगडे, भास्कर जाधव, साळू पारवे, उमाजी कातोरे, लहानू कातोरे, बन्सी जाधव, कचरू पारवे, सुरेश धोंगडे, चंद्रकांत पारवे, वसंत दराणे, देवराम पारवे, लहानू पिंगळे आदी उपस्थित होते.
कृष्णनगरच्या उपसरपंचपदी धोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:46 IST
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगरच्या उपसरपंचपदी सोनाली धोंगडे यांची निवड झाली आहे. गेल्या महिन्यात तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. महिन्याभरानंतर उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पडली.
कृष्णनगरच्या उपसरपंचपदी धोंगडे
ठळक मुद्देउपसरपंचपदासाठी सोनाली धोंगडे यांचा एकमेव अर्ज