शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक झाडांविषयी निर्णय घ्या; शिंदे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 14:17 IST

नाशिक : मुंबई येथे वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झाडे तोडण्यासंदर्भातील अर्जांची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबईत चेंबूर येथे एका सोसायटीत जीर्ण वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. सदरचे झाड धोकादायक असल्याने ते ...

ठळक मुद्देमुंबई येथे वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झाडे तोडण्यासंदर्भातील अर्जांची दखल नाशिक शहरातही अनेक जीर्ण आणि धोकादायक वृक्ष दुर्घटना होण्याच्या आतच त्यावर निर्णय होण्याची गरज आहे.महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्यावा,

नाशिक : मुंबई येथे वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झाडे तोडण्यासंदर्भातील अर्जांची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबईत चेंबूर येथे एका सोसायटीत जीर्ण वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. सदरचे झाड धोकादायक असल्याने ते तोडण्यासाठी महापालिकेकडे तक्रार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. नाशिक शहरातही अनेक जीर्ण आणि धोकादायक वृक्ष असून, ते पाडण्यासाठी महापालिकेकडे नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र, नाशिक महापालिकेत याबाबत कोणत्याही प्रकारे सत्वर निर्णय घेतला जात नाही, अशी तक्रार आहे. त्या पार्श्वभूमीवर विलास शिंदे यांनी निवेदन दिले आहे. सदरची झाडे पडून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याच्या आतच त्यावर निर्णय होण्याची गरज आहे. या अर्जांची पडताळणी करून जे वृक्ष खरोखरीच पाडण्यायोग्य आहेत त्यानुसार त्यांना परवानगी द्यावी आणि योग्य नसल्यास तसा अहवाल विशिष्ट कालमर्यादेत देणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वृक्षतोडीला मान्यता देण्याची सध्याची प्रक्रिया खूपच क्लिष्ट आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठका, मान्यता आणि प्रत्यक्ष पाहणी यातून मोठ्या प्रमाणात कालहरण होत असल्याने अशावेळी धोकादायक झाड आपोआप कोसळून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे सध्या महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही शेवटी निवेदनात करण्यात आली आहे.