शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा आरक्षण प्रस्ताव अंतिम टप्प्यात

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

गिरीश महाजन : होळकर जयंती कार्यक्रमात दिली माहिती

नाशिक : धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहेच; परंतु आरक्षण मिळण्यासाठी तांत्रिक बाजूदेखील तपासून पहाणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरक्षण संदर्भातील काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीतर्फे शनिवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात दिली.परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत असताना उपस्थितांनी भाषण थांबवून ‘धनगरांना आरक्षण कधी मिळणार ?’ असा जाब विचारल्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगताना केंद्र सरकारनेही या आरक्षणाला मंजुरी देणे आवश्यक असताना या प्रक्रियेसाठी थोडा वेळ जाणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारने जरी आरक्षणाला मंजुरी दिली तर ते धनगर समाजाचे तात्पुरते समाधान असेल त्यामुळे सरकारवर धनगर समाजाने विश्वास ठेवायला हवा, असे अवाहनही महाजन यांनी यावेळी केले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कायमच सकारात्मक दृष्टिकोन राहिला आहे. आरक्षणासाठी ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स’ या संस्थेकडून संशोधन आणि सामाजिक परीक्षण केले जात आहे. आधीच्या सरकारने आरक्षणाबाबत तत्कालीन केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असला तरी त्यातल्या त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव सादर करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष वेधत आरक्षणाची प्रक्रिया लांबणीवर पडत असून तातडीने आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आवाहन केले. महात्मे यांनी धनगर समाजाची विविध गटात विभागणी झाली हे चुकीचे असून, सगळ्यांनी एकोप्याने काम करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, नाशिक यांच्यातर्फे ‘पुण्यश्लोक आदर्श विवाह पुरस्कार’, ‘वीर मल्हार पुरस्कार’ आणि इतर राज्यांतून आलेल्या ज्येष्ठ समाजसेवकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सांगता सोहळ्याप्रसंगी हेमंत शिंदे दिग्दर्शित ‘मी अहल्या बोलतेय’ या एकपात्री नाटकाचेही सादरीकरण करण्यात आले.यावेळी आमदार बाळासाहेब सानप, डॉ. डी. एल. कराड, बापू शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास धनगर समाजबांधवांसह भाऊसाहेब तांबडे, टी. एस. बघेल, भवरसिंग होळकर, निरंजन धनगर, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. सुनीता महाले, घनश्याम होळकर, रामेश्वर पाटील, गोरख जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)