शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनश्री अहेर यांचा समिती सदस्यत्वाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:58 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे या कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य धनश्री केदा अहेर यांनी जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे या कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य धनश्री केदा अहेर यांनी जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी झालेल्या समितीच्या सभेप्रसंगी अहेर यांनी पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेत सभात्याग केला होता.जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीत पदाधिकाºयांवर तीव्र आक्षेप घेत अहेर यांनी आक्रामक भूमिका घेतली होती. शुक्रवारी त्यांनी अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यावर थेट आरोप करीत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांच्याकडेच सोपविला. अध्यक्ष सांगळे या कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्यामुळे जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या संबंधीचे कोणतेही कामे आपल्या गटात होत नसल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह अन्य पदाधिकाºयांविषयी सदस्यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. पदाधिकाºयांची कामे होत असताना आपल्या गटातील कामे होत नसल्याची ओरड सदस्यांकडून होती. मात्र याबाबत स्पष्ट कुणीही आवाज उठविला नव्हता.धनश्री अहेर यांनी या प्रकाराला वाचा फोडताना स्वपक्षीय पदाधिकाºयांवरही आरोप केल्यामुळे असंतोष उघड झाला आहे. अहेर यांच्या भूमिकेनंतर आता अन्य सदस्यही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचेही समजते.सदस्यांची कामे होत नसल्याबाबत यापूर्वीही स्थायी समिती आणि अन्य विषय समित्यांमध्ये चर्चा झाली आहे. सर्वसाधारण सभेत तर अध्यक्ष बोलण्यास पूर्ण संधी देत नसल्याची तक्रारी एका महिला सदस्याने यापूर्वी केली होती. धनश्री अहेर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता अन्य सदस्यांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Resignationराजीनामाnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद