शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव-टाकेद रस्ता हरवला खड्ड्यांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST

नांदूरवैद् : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगाव या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चार किलोमीटर अंतर ...

नांदूरवैद् : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगाव या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चार किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाल्यामुळे नागरिकांची दमछाक होत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह येथे येणाऱ्या भाविकांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील सर्वपरिचित असलेल्या तसेच रामायण काळातील घटनेतील साक्ष असलेल्या सर्वतीर्थ टाकेद ते धामणगाव या रस्त्याचे २०१४-१५ या वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आलेले होते. सर्वतीर्थ टाकेद या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने महाराष्ट्रातून येणारे हजारो भाविक याच रस्त्याचा वापर करत असतात. या रस्त्याने भाविकांची तसेच नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. हा रस्ता अनेक आदिवासी गावांना जोडणारा असून दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कुंभमेळ्याच्या वेळी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु त्यानंतर या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरील एकही खड्डा बुजविण्याचे कष्ट संबंधित विभागाने घेतले नाही. हा रस्ता अनेक आदिवासी गावांना जोडलेला असल्याने या रस्त्याने भरवीर बुद्रुक, अडसरे खुर्द, अडसरे बुद्रुक, म्हैसवळण मार्गे राजूर अकोला, टाकेद, वासाळीकडे अनेक नागरिक व पर्यटक भंडारदराकडे जात असतात. परंतु हा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात अडकल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने या रस्त्याला नेहमीच खड्डे पडत असल्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था होत असते. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याचे कायमस्वरूपी मजबूत काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

हा रस्ता अतिशय महत्त्वाचा व रहदारीचा असल्यामुळे या रस्त्याने अनेक कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, कंपनी कामगार, सिन्नर, नाशिक, मुंबई, इगतपुरी आदी ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने ये-जा करत असतात. तरी लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याची दखल घेत, या रस्त्याचे आदिवासी उपाययोजनेअंतर्गत, जिल्हा परिषदेमार्फत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अतिशय दर्जात्मक काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे, टाकेदचे सरपंच ताराबाई रतन बांबळे, अडसरेचे सरपंच संतू साबळे, ज्ञानेश्वर मोंढे, मायदराचे सरपंच साहेबराव बांबळे, बाळासाहेब गाढवे, पांडुरंग गाढवे, भाऊसाहेब गाढवे, दौलत बांबळे, संतोष साबळे, संपत मोंढे, नंदू गाढवे, राजाराम गाढवे, नामदेव घुमरे, निवृत्ती जाधव, संतोष जाधव, सागर गाढवे, वसंत गाढवे, रमेश गाढवे, अशोक गाढवे आदींनी केली आहे.

कोट...

हा रस्ता सन २०१४-१५ ला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बनविल्यानंतर आजपर्यंत या रस्त्याची कुठलीही डागडुजी केलेली नाही. टाकेद तीर्थक्षेत्री भाविक येत असतात. हा रस्ता पर्यटन, शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी दहा ते पंधरा गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून भविष्यात हा रस्ता मजबूत करायचा असेल, तर या रस्त्याचे काँक्रिटीकरणच होणे गरजेचे आहे.

- समाधान वारुंगसे, उपाध्यक्ष, युवासेना इगतपुरी तालुका

फोटो - ०५ धशमणगाव १

धामणगाव ते टाकेद रस्त्याची झालेली दुर्दशा.

050721\05nsk_25_05072021_13.jpg

धामणगांव ते टाकेद रस्त्याची झालेली दुर्दशा.