शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून धरणाचे काम ठप्प

By admin | Updated: January 17, 2016 22:15 IST

कळवण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन लक्ष देतील का ?

मनोज देवरे  कळवण१०० टक्के आदिवासी क्षेत्र असलेल्या कळवण तालुक्यातील ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या गळती प्रतिबंधक दुरु स्ती व सुधारणा कामास राज्य शासनाने ७ कोटी १२ लाख रु पयांची प्रशासकीय मान्यता दिली. गेल्या दोन वर्षांपूर्वी कामाची निविदा काढून कामासाठी ठेकेदार निश्चित करूनदेखील गेल्या वर्षभरापासून धरणाचे काम ठप्प झाल्याने ओतूरसह २० गावांतील शेतकरी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा व शासन निर्देशानुसार दोन वर्षांत काम पूर्ण करावे, अशी या भागातील जनतेची मागणी आहे. माजी आदिवासी विकासमंत्री ए. टी. पवार यांनी तब्बल ३५ वर्षांपासून शासनस्तरावर व पाटबंधारे विभागाकडे ओतूर धरणाची गळती थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याने २८ डिसेंबर २०१२ रोजी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती; मात्र नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, मेरी यांचा अहवाल पाटबंधारे विभागाला न मिळाल्याने निविदा प्रक्रि या झाली नव्हती. पाटबंधारे विभागाला मेरी नाशिक यांचा अहवाल प्राप्त झाल्याने मालेगाव पाटबंधारे विभागाने निविदा काढल्यानंतर शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. निविदाप्रक्रियेनंतर शासनाने या कामाचा ठेका औरंगाबाद येथील ठेकेदाराला दिला असून, अवघ्या दोन वर्षांत काम पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने प्रशासकीय मान्यता देताना दिल्या आहेत. असे असताना सदर कामातील तांत्रिक दोष पुढे करून पाटबंधारे विभाग टोलवाटोलवी करीत असून, आजमितीस काम बंद अवस्थेत आहे. मधल्या काळात माजी मंत्री ए. टी. पवार यांनी भूमिपूजन केल्यानंतर धरणाचे काम सुरू झाले होते. ठेकेदाराची यंत्रसामग्री धरणावर दाखल झाल्याने शेतकरी बांधवांना आशेचा किरण दिसत होता. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जे. पी. गावित यांनी धरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. सद्यस्थितीत धरणावर ठेकेदाराने आणलेली यंत्रसामग्री नसल्याने कामाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. धरणाचे काम करण्याच्या स्पर्धेतून पाटबंधारे विभागाची यंत्रणा लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केला आहे.