शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मोटर चोरांविरुद्ध धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:19 IST

सहाय्यक पोलीस निरीक्षक वावी पोलीस स्टेशन व त्यांचे पथक यांनी वावी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये होतकरू तरुणांचे ग्राम ...

सहाय्यक पोलीस निरीक्षक वावी पोलीस स्टेशन व त्यांचे पथक यांनी वावी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये होतकरू तरुणांचे ग्राम रक्षक दलाची पुनर्स्थापना केली. याच ग्राम रक्षक दलातील सदस्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहा. पोलीस निरीक्षक कोते यांनी तपासाचे चक्र फिरवून कोळपेवाडी ,(ता. कोपरगाव जि. अहमदनगर) येथील इसम रवी अबरसिंग मुळेकर (३१) व नीलेश अशोक कोळेकर (१९ ) या दोन संशयितांना ताब्यात घेतले व त्यांना मोटर चोरी बाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण, त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मोटर चोरी बाबत कबुली देऊन चोरी केलेल्या मोटर या भंगार व्यापारी वशीर फतू शेख (रा. कोळगावमाळ ता. सिन्नर) यांना विक्री केलेबाबत सांगितले. वावी पोलीस स्टेशनकडील पथकाने वशीर फतू शेख याच्या घरी जाऊन घरझडती घेतली असता विक्रीच्या उद्देशाने १८ इलेक्ट्रिक मोटारीचे मोकळे केलेले सुट्टे पार्ट मिळून आले. त्याआधारे वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर कामगिरीमध्ये पोलीस उपनिरीक्षक विजय सोनवणे, नितीन जगताप, पंकज मोढे, प्रकाश उंबरकर, सोपान शिंदे, गोविंद सूर्यवाड सहभागी झाले होते.

इन्फो

मोटर चोरीच्या प्रमाणात वाढ

सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्टेशन हद्दीत ४४ गावे आहेत. वावी हा ग्रामीण भाग असल्याने भौगोलिक दृष्ट्या पोलीस स्टेशनची हद्द मोठी आहे. अशा परिस्थितीत काही गुन्हेगार प्रवृत्तीचे इसम शेतकऱ्यांचे शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरून नेतात. सदर परिसरात काही दिवसापासून इलेक्ट्रिक मोटर चोरीचे प्रमाणात वाढ झाल्याने वाढत्या चोरीचे गुन्ह्यांना प्रतिबंध होणेसाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वावी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सागर कोते व पथकाने वावी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला.

फोटो - २० सिन्नर क्राइम

सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांच्या पथकाने विद्युत मोटारी चोरणाऱ्या संशयितांना अटक केली. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, सहाय्यक निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विजय सोनवणे, नितीन जगताप, पंकज मोढे, प्रकाश उंबरकर, सोपान शिंदे, गोविंद सूर्यवाड आदी.

200821\20nsk_34_20082021_13.jpg

फोटो - २० सिन्नर क्राइम