शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

‘नेटवर्क ’साठी डीजीपीनगरवासीय अंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:02 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवासी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाइल नेटवर्क पुरविणाºया सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात ओरड होत आहे.

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवासी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाइल नेटवर्क पुरविणाºया सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात ओरड होत आहे.  डीजीपीनगर क्रमांक-१ हा परिसर दुर्गम किंवा आदिवासी भागातील नाही तर जिल्हा परिषद कर्मचाºयांची सर्वात जुनी वसाहत व महापालिकेच्या आरोग्य सभापतींचे निवासस्थान असलेल्या हा परिसर नाशिक-पुणे महामार्गाला लागून आहे. डीजीपीनगर गृहनिर्माण संस्था ही सर्वात जुनी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखली जाते. या भागात मोबाइल कंपन्यांकडून नेटवर्क अत्यंत कमकु वतरीत्या पुरविले जात असल्याने नागरिकांच्या नाकीनव आले आहे. याचा सर्वाधिक त्रास गृहिणींना सहन करावा लागत आहे. डीजीपीनगर येथील घरांमध्ये कुठल्याही कंपनीचे नेटवर्क अजिबात मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत उंबरा ओलांडून बाहेर येणार नाही, तोपर्यंत मोबाइल कंपन्यांचे नेटवर्कचे चिन्ह दिसत नाही. तुमचा स्मार्टफोन कितीही महागडा असला व लेटेस्ट सिस्टम अपडेट वर्जन जरी असले तरी डीजीपीनगरमध्ये प्रवेश करताच जणू तुमच्या स्मार्टफोनच्या नेटवर्कला जणू आपोआप ‘जॅमर’ लागतो. मागील काही महिन्यांपासून ही समस्या मोठ्या स्वरूपात भेडसावत असल्याने डीजीपीनगरवासी त्रस्त झाले आहेत. ज्या कंपनीचे सीमकार्ड वापरले जात आहे, त्या कंपनीच्या ग्राहक सेवा अधिकाºयांशी वारंवार संपर्क साधून रहिवाशांनी ही समस्या निदर्शनास आणून दिली आहे; मात्र कुठल्याही कंपनीकडून या समस्येवर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नसल्याचे नागरिक सांगतात. एकूणच स्मार्टफोनवर संवाद साधणे डीजीपीनगरमधून जिकिरीचे ठरत असल्यामुळे इंटरनेटचा वापर व त्यासाठी लागणाºया ‘डेटा स्पीड’बाबत कल्पना न केलेली बरी.मोबाइल चोरी जाण्याच्या घटनामोबाइलला रेंज मिळत नाही म्हणून डीजीपीनगरवासीयांना घराच्या खिडकीमध्ये मोबाइल ठेवावा लागतो. त्यामुळे मोबाइल अलगदपणे चोरट्याकडून खिडकीमधून लंपास केले जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. चोरट्यांनीही डीजीपीनगर भागाकडे आपली दृष्टी फिरवली असून, मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेंज मिळविण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. मोबाइलची बॅटरी संपुष्टात येते. काही नागरिक मोबाइल चार्जिंगला लावून खिडक ीमध्ये ठेवतात. दिवसभर घरात महिला कामामध्ये असतात, अशावेळी चोरट्यांकडून मोबाइल लंपास केले जाते.अशोकामार्गावरही समस्याडीजीपीनगर क्रमांक-१पासून जवळ असलेल्या अशोकामार्ग परिसरातही मोबाइल नेटवर्कची समस्या काही महिन्यांपासून भेडसावत असल्याने नागरिकही वैतागले आहेत. नेमक्या कोणत्या कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी करावी, हा येथील रहिवाशांपुढे यक्षप्रश्न आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. या भागात मोठ्या संख्येने घरगुती प्रकल्प आहेत. फ्लॅटमध्ये मोबाइल नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पैसे भरूनही मोबाइल कं पन्यांकडून गलथान सेवा दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे....तुमचा फोनच लवकर लागत नाही’डीजीपीनगरवासीयांचा मित्रपरिवार, नातेवाइकांकडून सध्या एकच वाक्य मागील काही दिवसांपासून त्यांच्या कानी पडत आहे. ते म्हणजे, ‘अहो, तुमचा फोनच लवकर लागत नाही.’ जोपर्यंत मोबाइल खिडकीमध्ये किंवा अंगणात घेऊन येत नाही, तोपर्यंत रेंज येत नाही आणि संपर्कही होत नाही.यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Mobileमोबाइल