शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत भाविक, पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: May 19, 2014 01:06 IST

नाशिक : उन्हाळ्याच्या सुट्या आणि नुकतीच लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्याने नाशिकला तीर्थक्षेत्रानिमित्त येणार्‍या भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून, कपालेश्वर मंदिर, तपोवनात आज भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.

नाशिक : उन्हाळ्याच्या सुट्या आणि नुकतीच लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्याने नाशिकला तीर्थक्षेत्रानिमित्त येणार्‍या भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून, कपालेश्वर मंदिर, तपोवनात आज भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. प्रभू रामचंद्र, सीता व लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशकातील पंचवटीला पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे दर बारा वर्षांनी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यानेही नाशिक जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे नाशिकला वर्षभर भाविकांची गर्दी असते. यावेळी लोकसभा निवडणुका ऐन उन्हाळ्यात अन् शालेय सुट्यांचा कालावधी असल्याने अनेकांचे पर्यटनाचे नियोजन कोलमडले. शालेय सुट्या असल्या तरी मुलांसह पालकांना बाहेर निघता आले नाही. त्यामुळे एप्रिलच्या अखेरपर्यंत नाशकात पर्यटकांची वा भाविकांची फारशी गर्दी नव्हती. दरम्यान, गेल्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपताच आज (रविवारी) नाशकात भाविकांची गर्दी दिसून आली. पंचवटीतील कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे भाविकांची गर्दी असते त्याचाच अनुभव आज येत होता. तसेच सीतागुंफा येथेही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांच्या दर्शनासाठी रांगा होत्या. काळाराम मंदिरातही भाविकांची गर्दी दिसून आली. तपोवनातही भाविकांची दिवसभर रीघ लागलेली होती. विशेषत: उत्तर भारतीय भाविकांसह बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील भाविकांची आज गर्दी दिसून आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठावाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकही यावेळी दिसून आले. विदेशी पर्यटकांनीही लक्ष वेधून घेतले होते. समजेल त्या भाषेत ते पंचवटीतील धार्मिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. पंचवटीतील रामकंुडात स्नानासाठीही सकाळपासून सायंकाळपर्यंत गर्दी होती. विशेषत: महिला व लहान मुलांची संख्या अधिक होती. येत्या आठवडाभरात भाविकांच्या व पर्यटकांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.