शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चंदनपुरी येथे खंडोबा यात्रेत भक्तांची मांदियाळी

By admin | Updated: February 2, 2016 22:42 IST

चंदनपुरी येथे खंडोबा यात्रेत भक्तांची मांदियाळी

मालेगाव कॅम्प : तालुक्यातील श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे मल्हारभक्तांची मांदियाळी सुरू असून, भक्त ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषांनी दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे जेजुरी येथून आणलेली पायी मशाल चंदनपुरीत दाखल झाली. यानंतर खंडोबा मंदिरात मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यंदा यात्रा सुरू झाली त्या दिवसानंतर शनिवार, रविवार या दिवसांखेरीज यात्रेत अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. शहर, तालुक्यातील सतत दुष्काळ परिस्थितीचा परिणाम, बेमोसमी पाऊस, थंडीचे कमी-अधिक प्रमाण यामुळे यात्रेत मल्हार भक्तांची फारशी गर्दी दिसून आली नाही.या दोन दिवसांशिवाय यात्रेत हवे तसे मल्हारभक्त तसेच यात्रेत विविध वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली. त्यामुळे येथील मंदिर प्रशासन, दुकानदार व व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे, तर इतर सर्व दिवसांना दिवसभर मल्हारभक्तांचा राबता चंदनपुरी यात्रेत दिसून येत आहे. यात्रेत चारशेहून अधिक सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स्, मनोरंजनाची साधने, पूजेच्या साहित्याचे व भंडाऱ्याची दुकाने थाटली आहेत. या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.व्हीआयपी दर्शनाची सोय करण्यात आल्याने त्यासाठी १००रुपये मोजावे लागत आहे. यामुळे असंख्य मल्हारभक्तांनी नाराजी व्यक्त केली. यात्रेतील इतर खेळणी व खाद्यपदार्थांच्या वस्तू या भाववाढीमुळे मल्हारभक्तांनी यात्रेत आपले हात आखडते घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. यात्रेसाठी जय मल्हार ट्रस्ट व ग्रामपंचायतीतर्फे सर्व सोयी उपलब्ध करून दिल्याचे चंदनपुरीच्या सरपंच योगीता अहिरे, उपसरपंच केतकी पाटील यांनी सांगितले. यात्रोत्सवासाठी माजी सरपंच राजेंद्र पाटील, मनोहर जोपळे, सतीश पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर वाघ, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. (वार्ताहर)