शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

देवगावी जगदंबा माता मंदिर वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:50 IST

देवगाव : देवगाव येथील नवसाला पावणारी अशी महती असणारी जगदंबा माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देदर्शनासाठी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.

देवगाव : देवगाव येथील नवसाला पावणारी अशी महती असणारी जगदंबा माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी गुरू पद्धमाकर जोशी, सचिन जोशी, पुजारी बाळासाहेब गुरव,पुंजाराम गुरव यांनी मंत्राच्या जयघोषात विधीवत पुजा केली. यावेळी संतोष कुलथे,बापु शिंदे, बाबासाहेब बोचरे यांनी सपत्नीक सत्यनारायण पुजा केली.जगदंबा मातेची मूर्ती पूर्णाकृती असून आपले वाहन मत्ससहित वाघावर विराजमान आहे. तसेच जिद्दीचे व चिकाटीचे प्रतिक असलेले कासवही येथे विराजमान करण्यात आले आहे. देवीसमोर अखंड नंदादीप तेवत असतो.या मातेची अंबाबाई म्हणूनही प्रसिद्धी असल्याने नवरात्र उत्साहात पहाटे पाच पासूनच तर दत्तजयंतीपासून तीन दिवस भरत असलेल्या यात्रेत भाविकांची भरपूर गर्दी असते. भाविक नतमस्तक होऊन नवस करतात. तर काही नवस पूर्ण झाला म्हणून मनोभावे पूजा होम हवन करतात. अशी महती असलेल्या जगदंबा माता मंदिराचा वर्धापनदिन वटसावित्री पौर्णिमेला येतो सकाळपासूनच महिलांनी मोठया प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.याप्रसंगी पर्बत बोचरे, लहानु मेमाणे, दत्तु बोचरे, राजेंद्र मेमाणे, मनोहर बोचरे, रघुनाथ साबळे, नामदेव बोचरे, रामनाथ माने, लहानु थोरात, रतन मेमाणे, सोमनाथ मेमाणे, सर्जेराव गायकवाड, मधुकर लोहरकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो १९ जगदंबा माता)