नाशिक : गोव्याच्या निनादिनी व कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने उद्या (दि.१७) पंडित राजाभाऊ देव यांच्या स्मृतिनिमित्त देवगांधार या स्वरश्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुभाष दसककर आणि अलका दसककर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गंगापूररोड येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कुसुमाग्रज स्मारकात आज देवगांधार
By admin | Updated: January 16, 2015 23:35 IST