शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

ईपीएफओच्या योजनांचा लाभ घ्यावा देवेंद्र सोनटक्के : लखमापूर येथे कार्यशाळेचे आयोजन; मान्यवरांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:42 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन (ईपीएफओ) कार्यालयातर्फे कामकाज डिजिटल प्रणालीद्वारे आॅनलाइन होत आहे.

दिंडोरी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन (ईपीएफओ) कार्यालयातर्फे कामकाज डिजिटल प्रणालीद्वारे आॅनलाइन होत आहे. ईपीएफओ सदस्यांसाठी विविध योजना आखण्यात आल्या असून, त्याचा फायदा कर्मचारी व आस्थापना यांनी घ्यावा, असे आवाहन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन नाशिक विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र सोनटक्के यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील एव्हरेस्ट इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सभागृहात तालुक्यातील विविध आस्थापनांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठनच्या (ईपीएफओ) विविध योजना व आॅनलाइन कामकाज प्रणालीची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिकारी अनिल ढोकले, सुनील बकरे, अरुण दयाल यांनी प्रधानमंत्री रोजगार योजना, ई-केवायसी, आधार यूएएन लिंकिंग, यूएएन अ‍ॅक्टिव्हेशन आदींबाबत मार्गदर्शन केले. आधार सिडिंगबाबत सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक स्वप्नील भालेराव यांनी मार्गदर्शन केले. पीएफ विभागाने थेट तालुका पातळीवर येत पीएफच्या विविध योजनांची माहिती सविस्तरपणे दिली. याबाबत एव्हरेस्ट कंपनीचे व्यवस्थापक पीयूष तिवारी यांनी आभार मानले. यावेळी एव्हरेस्टचे अधिकारी के. एल. कुटे, संदीप देशमुख आदींसह विविध आस्थापनांचे अधिकारी, कामगार, ठेकेदार, प्रतिनिधी, सीएससी केंद्रचालक उपस्थित होते.