शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

कोट्यवधींची विकास कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:19 IST

मागील चार वर्षांच्या काळात मतदारसंघात विविध कामांसाठी जवळपास दोन हजार कोटींचा निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला असून रस्ते, सिंचन, ग्रामीण सोयीसुविधा उभाल्या जात असल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील चार वर्षांच्या काळात मतदारसंघात विविध कामांसाठी जवळपास दोन हजार कोटींचा निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला असून रस्ते, सिंचन, ग्रामीण सोयीसुविधा उभाल्या जात असल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आ.तान्हाजी मुटकुळे यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा संकल्प सिद्धी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मतदारसंघातच नव्हे, तर जिल्ह्यात कोट्यवधीची विकास कामे भाजप सरकारच्या काळात होत आहेत. २५१५ योजनेत ५.२५ कोटी, जिल्हा वार्षिक योजनेत ८.४0 कोटी, नगरपंचायत सेनगाव- पाणीपुरवठा व रस्त्यांसाठी २६ कोटी, नगर परिषद हिंगोली- भूमिगत गटार, न.प. इमारत, सभागृह, शेतकरी भवन आदीसाठी १२0 कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत १२२.४१ कोटी, राज्य अर्थसंकल्पीय तरतुदीत २१९ कोटी, नाबार्डअंतर्गत रस्त्यांसाठी २.५0 कोटी, केंद्रिय मार्ग निधी योजनेत ९.0२ कोटी, इमारतींसाठी २५ कोटी, सिंचन अनुशेषांतर्गत बंधाऱ्यांना ७.0७ कोटी, जलयुक्त शिवार योजनेत ११ कोटी, इतर मोठ्या कामांसाठी ४00 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये साखरा-जयपूर रस्ता, माळहिवरा गोरेगाव रस्ता, मालेगाव, रिसोड, सेनगाव, हिंगोली रस्ता, फाळेगाव ते येलदरी रस्ता आदींचा समावेश आहे. याशिवाय जनतेच्या सहभागातून नर्सी नामदेव येथील मंदिराचे व हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वप्न साकार झाल्याचेही ते म्हणाले.यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, नगरसेवक गणेश बांगर, के.के.शिंदे उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी रामरतन शिंदे यांच्यावर सरशंधान साधताना माझीच कामे ते आपल्या नावाने देत असल्याचे सांगून दलित वस्तीत मी ही कामे शिफारस केल्याने मंजूर झाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे रामरतन शिंदे यांनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांना दिलेल्या पत्रातील जांभरुण रोडगे, जवळा बु., देवूळगाव आदी गावांची यादी दाखवून तीच मंजूर झाल्याचे सांगितले. तर या कामांची मी नव्हे, तर पालकमंत्र्यांनीच शिफारस केली होती, असेही सांगितले. या प्रकारामुळे प्रथमच मुटकुळे व शिंदे यांच्यातील कलगीतुरा प्रथमच उघडपणे समोर आला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण