सुरगाणा : तालुक्यात पर्यटन विकासाला चालना देणारी विविध ठिकाणी पर्यटन स्थळे असून त्यापैकीच एक असलेले पिंपळसोंड जवळील महाराष्ट्र व गुजरात सीमेविरल तातापाणी येथील गरम पाण्याचे झरे विकिसत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी याचे कडून पाहणी करणेत आली.सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा - पिंपळसोड येथे गरम पाण्याचे झरे आहेत त्यांचा विकास करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने घेतला असून त्याचा नाशिक येथील महामंडळाचे कार्यालयाने क, वर्गात समावेश केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस.के.शेळके यांनी दिली आहे . येथील गरम पाण्याचे झरे यांचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळून स्थानिक आदिवासींना रोजगार मळून त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. उंबरपाडा - पिंपळसोड हे गाव तालुक्याचा पश्चिमेला गुजरात सिमेवरील शेवटच्या टोकाला असलेले आहे. या गावाच्या हद्दीलगत अवघ्या एक ते दीड कि . मी. अंतरावरून नाशिक - वणी - सापुतारा - वघई - वासदा - सुरत हा गुजरात राज्याला जोडणारा राज्य महामार्ग जात आहे. या महामार्गावरु न वर्षभरात सुमारे लाखो पर्यटक येतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी येथील गरम पाण्याचे झरे विकिसत करण्याची नितांत आवश्यकता आहे. पिंपळसोड गावालगत गुजरात राज्यातील वघईचे राखीव घनदाट जंगल आहे. त्यामुळे हा भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला संपन्न असा आहे. तातापाणी याचा अर्थ आदिवासी बोलीभाषेत गरम पाणी असा आहे.या तातापाणी जवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या गायचोंड, साखळचोड , पायरचोंड , वाहूटचोंड असे उंच कड्यावरून फेसाळत कडेकपारीत पडणारे धबधब्यांची विवीधरूपे पावसाळ्यात न्याहाळता येतात. सापुतारा गुजरात महामार्गावरील वघई जवळील गिरा या धबधब्यापासून पाच ते सात कि.मी. अंतरावर हे सर्व धबधबे आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या नैसिर्गक साधन संपत्तीचे योग्य प्रकारे जतन व संवर्धन करणेसाठी या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. याठिकाणी पाहणी करण्यासाठी उंबरठाण बीटचे वनक्षेत्रपाल दुसाने, कुवर, सर्वेक्षण अधिकारी बागुल, कादरी, शाखा अभियंता एस. के.शेळके, डी. जी. ठाकरे, हेमंत चौधरी, जसूराम ठाकरे, आदिवासी बचाव कृती समतिीचे तालुका अध्यक्ष रतन चौधरी, माजी सैनिक शिवा चौधरी, लहानू गावित, मनिराम चौधरी आदी उपस्थित होते.
केम पर्वत येथील विकास काम रखडले
By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST