शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीविना समाजाचा विकास अशक्य

By admin | Updated: February 11, 2017 23:51 IST

देवरे : भाषा विषयाचे राज्यस्तरीय चर्चासत्र

मालेगाव : प्राचीन काळापासून समाजात स्त्रीला महत्त्व आहे. मनातील दु:ख आणि सुखाचा अनुभव स्त्रीशिवाय कोणीही घेऊ शकत नाही. स्त्रीविना समाजाचा विकास होणे अशक्य आहे म्हणून ईश्वराने ममत्वाचे स्थान फक्त स्त्रीच्या ठायी दिलेले आहे, असे मत महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे यांनी येथे केले. तालुक्यातील सौंदाणे येथील कला महाविद्यालयात ‘भारतीय साहित्यातील स्त्री चिंतन’ या विषयावरील दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संयोजक डॉ. आर. एस. देवरे यांनी मार्गदर्शन केले. मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम प्रमुख पाहुणे होते. महाविद्यालयाचे डॉ. उमेश जगदाळे, सोमैया महाविद्यालयाचे डॉ. जे. एस. मोरे, एस. पी. ए. महिला महाविद्यालयाच्या डॉ. अनिता नेरे, डॉ. भारती खैरनार, प्रा. भारती कापडणीस यांनी सहभाग घेतला. राज्यातून प्राध्यापकांनी ३४ शोधनिबंधाचे वाचन केले.  चर्चासत्राचे समन्वयक इंग्रजी विभागप्रमुख प्रा. बी. पी. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. यू. चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विभागप्रमुख डॉ. व्ही. डी. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.  चर्चासत्राचे समन्वयक, मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण पाटील यांनी आभार मानले. प्रा. डी. झेड. सावळे, प्रा. एम. डी. भामरे, प्रा. डॉ. अनिल पवार, प्रा. एन. ए. पाटील, प्रा. डॉ. बी. यू. पवार, प्रा. एस. के. बोरसे, प्रा. डी. पी. पवार, कार्यालयीन अधीक्षक बी. यू. अहिरे, डी. जे. हिरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)