शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विकास नियमावली पुढील आठवड्यात?

By admin | Updated: February 23, 2017 00:27 IST

उत्सुकता : मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा

नाशिक : महापालिका निवडणूक काळात सोशल मीडियावर व्हायरल झालेली शहर विकास नियंत्रण नियमावली विरोधकांचा कपोलकल्पित उद्योग असल्याचे जाहीर स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत दिल्यानंतर आता पुढील आठवड्यात विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  राज्य सरकारने महापालिका निवडणुकीपूर्वी नाशिकचा शहर विकास भागश: आराखडा घोषित केला, परंतु सोबत शहर विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे शहरातील ‘कपाट’ आणि ‘टीडीआर’चा विषय प्रलंबितच राहिलेला आहे. सदर नियमावली प्रसिद्ध व्हावी यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांसह नगरविकास सचिवांनी याबाबत आश्वासनेही दिली, परंतु नियमावली प्रसिद्ध होऊ शकली नाही. दरम्यान, निवडणूक आचारसंहितेत नियमावली अडकल्याचे सांगत ती लांबविली जात असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकांसह भाजपा विरोधक राजकीय पक्षांकडून केला गेला. त्यातच महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना सोशल मीडियावर २०६ पानांची शहर विकास नियंत्रण नियमावली व्हायरल झाली. त्यात ‘कपाट’चा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे भासविण्यात आले असले तरी बाल्कनीबाबत अडसर निर्माण झाल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर होता. सदर नियमावली खरी की खोटी यावर चर्चा झडल्या. मात्र, भाजपा शहराध्यक्षांसह पालकमंत्र्यांनी व्हायरल नियमावली खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिले तर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना छेडल्यानंतर फडणवीस यांनी नाशिकच्या जाहीर सभेत सदर नियमावली कपोलकल्पित असल्याचे स्पष्ट केले व ‘कपाट’चा मुद्दा मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.  गुरुवारी महापालिका निवडणुकीची मतमोजणी होत असून, , त्यावर विकास नियंत्रण नियमावलीचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा बांधकाम व्यावसायिकांमध्ये आहे. मात्र, पुढील आठवड्यात कोणत्याही स्थितीत विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध होण्याचे सूतोवाच भाजपाच्या एका नेत्याने केले आहे. (प्रतिनिधी)