शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या मेंदूचा विकास सहा वर्षांतच - रमेश परतानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:23 IST

प्रत्येक मुलाची आकलनशक्ती आणि मेंदूची क्षमता सारखीच असते. पहिल्या सहा वर्षांतच मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो त्यामुळे मुलांची क्षमता ओळखून त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर मुलांच्या मेंदूचा विकास अधिक चांगल्या रीतीने होऊ शकेल, असे प्रतिपादन आंतरराष्टय शिक्षणतज्ज्ञ रमेश परतानी यांनी केले.

नाशिक : प्रत्येक मुलाची आकलनशक्ती आणि मेंदूची क्षमता सारखीच असते. पहिल्या सहा वर्षांतच मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो त्यामुळे मुलांची क्षमता ओळखून त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर मुलांच्या मेंदूचा विकास अधिक चांगल्या रीतीने होऊ शकेल, असे प्रतिपादन आंतरराष्टय शिक्षणतज्ज्ञ रमेश परतानी यांनी केले.  महेश नवमीनिमित्ताने श्री माहेश्वरी समाजाच्या वतीने परतानी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, उद्योजक अशोक कटारिया, विनोद कपूर, रोशन जाजू, प्रदीप बूब, श्रीनिवास लोया, राजेंद्र डागा, रामेश्वर सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी परतानी म्हणाले, मुलांची आकलन क्षमता आणि त्यांचे कौशल्य हेरून त्यांच्यावर योग्य शैक्षणिक संस्कार होणे अपेक्षित आहे. मुलांना तुम्ही काय दाखविले, ऐकविले, आपण त्यांना काय करण्यास सांगितले यावर त्यांच्या मेंदूचा विकास अवलंबून असतो. सहा वर्षांपर्यंत मुलांच्या मेंदूचा विकास इतका होतो की त्यांना दहा भाषा शिकविल्या जाऊ शकतात, असेही परतानी म्हणाले. पहिल्या सहा वर्षांत झालेल्या मेंदूच्या विकासावर पुढच्या आयुष्याचा मेंदूचा विकास अवलंबून असतो, असेही परतानी म्हणाले. यावेळी त्यांनी मेंदूच्या दहा भागांचे कार्य आणि महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. अशोक बंग यांनी आभार मानले. याप्रसंगी विनोद जाजू, सुरेश केला, बालकिसन धूत, यशवंत पाटील, राजेंद्र डागा, रोशन जाजू, श्रीनिवास लोया, कांतालाल लाहोटी, कल्पेश लोया, सोमनाथ जाजू, रामेश्वर मालपाणी, प्रदीप बूब, अरविंद नावंदर, हेमंत मालपाणी, प्रतिभा चांडक, आस्था कटारिया आदी उपस्थित होते.नात्यातील सुगंध वृद्धिंगत करा : परतानीअसत्यालाच सत्य समजणे, एका ठराविक दृष्टिकोनातून जीवनाकडे बघणे, वस्तुस्थितीकडे पूर्वग्रहदूषितपणे बघणे यासारख्या कारणांमुळे मनुष्याच्या जीवनात दु:ख येतात़ जीवनाकडे तटस्थ भूमिकेतून बघणे, वस्तुस्थितीवर आधारित मत ठरविणे, सत्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे व नात्यातील सुगंध अधिकाधिक वृद्धिंगत करीत जगणे म्हणजे जीवनाचा खरा आस्वाद घेणे असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पिरीच्युअल व मॅनेजमेंट ट्रेनर रमेश परतानी यांनी केले़श्री महेशनवमी महोत्सव-२०१८ या कार्यक्रमानिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबाद सभागृहात आयोजित ‘नात्यातील सुगंध’ या विषयावर ते बोलत होते़ परतानी यांनी यावेळी सांगितले की, जीवनात प्रत्येकाला दु:खाला केव्हा न केव्हा तरी सामोरे जावे लागतेच़ मात्र या दु:खाला विसरण्यासाठी नेमका किती वेळ द्यायचा हे ठरवावे लागते़ अन्यथा, या दु:खातच आपले आयुष्य निघून जाते़ कुटुंबातील सदस्य हे गेल्यानंतर दु:ख हे साहजिकच आहे़ कुटुंबातील सदस्य केव्हा न केव्हा तरी जाणारच, तो केव्हा जाणार याची आपल्याला माहिती नसते त्यामुळे देवाने दिलेला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा़ एकमेकांना प्रेम द्या, काळजी करा, जीवनातील प्रत्येक क्षण हा एक आठवण बनेल, असे जीवन जगण्याचे मार्गदर्शन परतानी यांनी केले़यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक बंग, उमेश मुंदडा, जयप्रकाश जातेगावकर, अशिष भन्साळी, रामविलास बूब, राधाकिसन चांडक, बी़ बी़ चांडक आदी मान्यवर उपस्थित होते़ प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ या प्रसंगी व्याख्यानास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :Nashikनाशिक