शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

विकासक अडकणार बाल्कनीच्या फेऱ्यात

By admin | Updated: January 24, 2017 00:42 IST

‘कपाट’प्रश्न सुटणार : पुणे विकास आराखड्यावरून चर्चेला उधाण

नाशिक : महापालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणारा कपाटाचा प्रश्न पुण्यातील शहर विकास आराखड्याचा विचार करता सुटण्याचे संकेत आहेत. मात्र याच विकास आराखड्यातील नियम नाशिकमध्ये लागू झाल्यास कपाटाच्या प्रकरणातून सुटणारे विकासक बाल्कनीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्य सरकाने पुणे शहरासाठी मान्यता दिलेल्या विकास आराखड्यातील तरतुदींनुसार, कपाटाचा भाग खोलीत समावेशामुळे निर्माण झालेला कपाटाचा प्रश्न सुटण्याचे संकेत आहेत. या विकास आराखड्यातील नियम नाशिक शहराच्या विकास आराखड्यातही लागू झाले, तर शहरातील आठ हजार कपाट प्रकरणांपैकी ६० टक्के प्रश्न सुटतील, असा विश्वास बांधकाम क्षेत्रात तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. परंतु याच आराखड्यातील तरतुदी तंतोतंत लागू झाल्यास बांधकाम व्यावसायिकांना बाल्कनी बंद करून तिचा खोलीत समावेश करता येणार नाही.  सध्या शहरातील अनेक इमारतींमध्ये बाल्कनी बंद करून ही जागा खोलीत समावेश केला जातो. त्यानंतर केवळ दोन हजार रुपये दंड भरून हे बांधकाम नियमित करण्याचा प्रकार होत असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे, परंतु पुण्यातील विकास आराखड्यातील नियमावलीनुसार यापुढे बाल्कनी बंद करता येणार नाही. त्यामुळे विकासक कपाटाच्या प्रकरणातून सुटणारे विकासक बाल्कनीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)