शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्त्यांसह सुसंगत रणनीती आखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

नाशिक : आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडत असून, यंत्रणेत समन्वयाचा अभाव आहे. सरकारने आता नाकर्तेपणा बाजूला ...

नाशिक : आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडत असून, यंत्रणेत समन्वयाचा अभाव आहे. सरकारने आता नाकर्तेपणा बाजूला ठेवून २५ जानेवारीपासून होणाऱ्या अंतिम सुनावणीसाठी सर्व याचिकाकर्त्यांना सोबत घेऊन आरक्षणासाठी सुसंगत रणनीती आखावी, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी शनिवारी (दि. १२) नाशिकमध्ये बोलताना केली आहे. मराठा आरक्षण सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. ९ डिसेंबर रोजी या घटनापीठासमोर सुनावणी झाली. मात्र, यावेळी आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली. ज्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरक्षणास स्थगिती दिली होती, त्या तिन्हीही न्यायाधीशांचा पाच सदस्यीय न्यायाधीशांच्या घटनापीठात समावेश आहे. त्यामुळे ९ डिसेंबर रोजी सुनावणीत झालेला निर्णय अपेक्षितच होता, असेही मेटे म्हणाले. तसेच आरक्षणासंदर्भात सुनावणीसाठी सात अथवा नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाची मागणी राज्य सरकारने करणे आ‌वश्यक होते. त्यासाठी सरकारने कोणताही पाठपुरावा केला नाही. उलट काही याचिकाकर्त्यांनी पाच सदस्यीय घटनापीठाची मागणी केल्याने याचिकाकर्त्यांमधील असमन्वयही दिसून आला. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी सरकारने सर्व याचिकाकर्त्यांना सोबत घेऊन आरक्षणासाठी सुसंगत रणनीती आखण्याची गरज आहे.

----

इन्फो-

समाजात विसंवाद निर्माण करण्याचा आरोप

मराठा व ओबीसी समाजात विसंवाद निर्माण व्हावा, यासाठी राज्य सरकारमधील छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे मंत्री तसेच प्रकाश शेंडगेंसारखे ओबीसी नेते जाणीपूर्वक प्रयत्न करीत असल्याचा आरोपही विनायक मेटे यांनी केला. सरकारमधील मंत्री आणि महाआघाडीतील नेते ओबीसी व मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार असे प्रकार गांभीर्याने घेत नसल्याने मराठा आरक्षणाच्याविरोधात मोर्चे काढले जात असल्याचेही मेटे म्हणाले.