शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

देवळे पुलाला भगदाड

By admin | Updated: July 15, 2017 01:04 IST

घोटी : घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाचा मलबा रात्री अवजड वाहनांमुळे कोसळला. या पुलाला मोठे भगदाड पडले

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाचा मलबा रात्री अवजड वाहनांमुळे कोसळला. या पुलाला मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक आज सकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक साकूर फाटा व मुंढेगाव मार्गे वळविण्याच्या निर्णय महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अवघ्या पंधरा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पूल जीर्ण झाल्याने चारच महिन्यांपूर्वी या पुलाच्या दुरुस्ती चे काम करण्यात आले होते. मात्र हे काम अर्धवटआणि निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता. अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सदर पूल बंद करण्यात यावा याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते.  याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करून पूल धोकादायक झाला असल्याची जाणीव सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि शासनाला करून दिली होती. वेळीच दखल न घेतल्याने अखेर गुरुवारी मध्यरात्री या पुलाचा मध्यभागावरील मलबा कोसळून पुलाला मोठे भगदाड पडले आहे. या घटनेची कल्पना आल्याने वाहनचालकांनी पोलिसांना आणि तहसील विभागाला कळविले. आज सकाळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे, नायब तहसीलदार संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता  आव्हाड, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी पुलाची पाहणी करीत पूल वाहतुकीसाठी बंद  करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरकडील वाहतूक साकूर फाटा, तर घोटीहून जाणारी वाहतूक मुंढेगाव मार्गे वळविण्यात आली आहे.उपअभियंत्यांचा अजब उपायदेवळे पुलाचा मलबा कोसळून भगदाड पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी राहुल पाटील व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे पथक पुलाची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. सकाळी घटनेची माहिती समजूनही सार्वजनिक बांधकामचे अधिकारी विलास आव्हाड दुपारी १२ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. उपस्थित असलेल्या नागरिकांनी व अधिकाऱ्यांनी आव्हाड यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. आव्हाड यांनी असमर्थनीय उत्तरे देत, या पुलाशेजारील व सध्या पाण्याखाली असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून वाहतूक सुरू करणार असल्याचे स्पष्ट केल्याने अधिकाऱ्याच्या या उत्तरावर सर्वांनी संताप व्यक्त केला. ब्रिटिशकालीन पूल दाखवा असे आव्हान माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांनी केल्यानंतर मात्र उपभियंत्यांची भंबेरी उडाली.