देवळा : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना देण्यात आले.तालुक्यात परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा, अतिवृष्टीने बाधित शेतकºयांना तत्काळ प्रतिएकरी २५ हजार रु पये नुकसान भरपाई द्यावी. शेतकºयांचे वीजबिल सरसकट माफ करावे, विमा कंपन्यांनी कुठल्याही निकष न लावता पीकविमा मंजूर करावा व तो शेतकºयांच्या खात्यावर तत्काळ जमा करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.निवेदनावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, देवळा शहरप्रमुख मनोज आहेर, नजिम तांबोळी, भाऊसाहेब चव्हाण, भाऊसाहेब आहेर, विश्वनाथ गुंजाळ, विलास शिंदे, भीमराव पवार, अशोक आहेर, विकी देशमुख आदीं शिवसैनिकांच्या स्वाक्षºया आहेत.
देवळा शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 23:33 IST
देवळा : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना देण्यात आले.
देवळा शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन
ठळक मुद्देनिवेदन देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना देण्यात आले.