शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या मक्तेदारांचा बेमुदत उपोषणाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:18 IST

नाशिक : जिल्हा परिषदेने सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्था आणि नोंदणीकृत ठेकेदारांना दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने येत्या २२ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला.

नाशिक : जिल्हा परिषदेने सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्था आणि नोंदणीकृत ठेकेदारांना दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने येत्या २२ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला.जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीची बैठक सोमवारी (दि. १४) जिल्हा मजूर सहकारी संघाच्या सभागृहात पार पडली. संबंधित साहित्य पुरवठादार हे घरी येऊन पैशासाठी तगादा लावण्याबरोबरच कुटुंबीयांचा उद्धार करीत असल्याने मक्तेदारांची सामाजिक प्रतिमा मलिन होत आहे. मजुरांची मजुरीसुद्धा देत येत नसल्याने कामे ठप्प झाली आहेत. मजुरीअभावी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेची कामे ठप्प पडूनसुद्धा प्रशासन मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने मक्तेदारांना दिलेले धनादेश वटण्यासाठी तत्काळ तोडगा काढावा, या मागणीसाठी येत्या २२ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना पदाधिकारी, मजूर संस्था संचालक, नोंदणीकृत ठेकेदार बेमुदत उपोषणास बसणार आहे. मजूर संघाच्या सभागृहात झालेल्या बैठकीस सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. टी. शिंदे, कोषाध्यक्ष विनायक माळेकर, मजूर संस्था संचालक विठ्ठलराव वाजे, जगन वाजे, शशिकांत आव्हाड, उत्तम उगले, बेरोजगार अभियंता संघटनेचे पदाधिकारी चंद्रशेखर डांगे, संदीप वाजे, अजित सकाळे, संजय कडनोर, अनिल आव्हाड, अमोल मोरे आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषदेने दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे धनादेश वटत नसल्याच्या प्रकरणी चर्चा होऊन त्यावर तोडगा काढण्याबाबत निर्णय झाला. जिल्हा परिषदेच्या मक्तेदारांनी सीमेंट, स्टील, डांबर, वाळू, खडी आदी साहित्य पुरवठा करणाºया मटेरिअल सप्लायरचा सारखा पैशांसाठी तगादा चालू आहे.