शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिक बनविण्याचा निर्धार

By admin | Updated: June 27, 2014 00:13 IST

सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिक बनविण्याचा निर्धार

 

सिन्नर : देशातील नागरिक स्वाक्षरी करण्यापुरते साक्षर होऊन उपयोग नाही, तर सुसंस्कृत झाले पाहिजेत. त्यासाठी आगामी काळात रोटरी क्लबच्या माध्यमातून सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट गर्व्हनर दादासाहेब देशमुख यांनी केले. सिन्नर रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ येथील साईशाहू हॉटेलच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी देशमुख बोलत होते. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष सोमनाथ वाघ, मावळते सचिव राजेश वाजे, नूतन अध्यक्ष अनिल काळे, नूतन सचिव प्रमोदसिंग व्यासपीठावर उपस्थित होते. पोलिओ मुक्त भारत हे रोटरीचे स्वप्न आहे. त्यासाठी रोटरीने गेल्या काळात मोठे योगदान दिले आहे. पोलिओ मुक्तीनंतर देशातील निरक्षरता दूर करण्यासाठी व देश शंभर टक्के साक्षर करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली. रोटरीच्या जिल्हा शाखेचे हे रजत वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्ह्यातील रोटरीच्या सभासदांची संख्या एक हजारपर्यंत वाढविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. याप्रसंगी रोटरीच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सनदी लेखापाल अभिजित गुजराथी यांनी नव्याने क्लबमध्ये प्रवेश देण्यात आला. सुनील भडांगे व किरण मुत्रक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी नाशिक रोटरीचे जी. एम. जाधव, डॉ. आशिष चौरासिया, रूपेश झटकारे, सुधीर रावले यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. कैलास क्षत्रिय व स्मिता आणेराव यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)