शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातआरोग्य विद्यापीठाचा बृहत आराखडा : जिल्ह्यांमध्ये प्रत्येक आरोग्यशास्त्राचे महाविद्यालय असावे

By admin | Updated: October 30, 2014 23:05 IST

राज्यातआरोग्य विद्यापीठाचा बृहत आराखडा : जिल्ह्यांमध्ये प्रत्येक आरोग्यशास्त्राचे महाविद्यालय असावे

१९१ वैद्यकीय महाविद्यालयांची आवश्यकतासंदीप भालेराव ल्ल नाशिकआरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयार केलेल्या बृहत आराखड्यानुसार राज्यात अद्यापही १९१ वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठाने तयार केलेल्या आराखड्यानुसार वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे जाहीर केले असले, तरी शासन आणि संस्थाचालकही याबाबत उदासीनच असल्याचे दिसून येते. राज्यात वैद्यकीय शिक्षणाचे समन्याय वाटप व्हावे यासाठी दर पाच वर्षांनी विद्यापीठाकडून बृहत आराखडा तयार केला जातो. विद्यापीठाने तयार केलेल्या २०१५-१६ च्या आराखड्यानुसार राज्यात अद्यापही विविध आरोग्य विद्याशाखांची १९१ महाविद्यालये सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय शाखेची १५, दंतवैद्य शाखेची १७, आयुर्वेदाची ०८, युनानी- ३०, होमिओपॅथी- ०९, फिजिओथेरपी- २२, आॅक्युपेशनल थेरी- ३२, बी.एस्सी. नर्सिंग- ०६, पीबी बी.एस्सी. नर्सिंग- २०, तर बॅचरल आॅफ अ‍ॅडॉलॉजीची ३२ अशा १९१ वैद्यकीय महाविद्यालयांची आवश्यकता असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. ही महाविद्यालये कोणत्या जिल्ह्यात असावीत याचादेखील आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आरोग्यशास्त्राचे शाखानिहाय महाविद्यालय असावे. आदिवासी आणि मागास भागात महाविद्यालय सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काही बाबींची सूटदेखील दिली जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात पाच लाख लोकसंख्येमागे एक वैद्यकीय महाविद्यालय असावे असा निकष तयार करण्यात आला आहे. त्यानुसार संस्थाचालकांना वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत विद्यापीठाने आवाहन केले होते. गेल्या सप्टेंबरमध्ये यासंदर्भात संस्थाचालकांचे समुपदेशनदेखील करण्यात आले होते. प्रस्ताव सादर करताना घ्यावयाची काळजी आणि त्याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्तीही करण्यात आली होती. असे असतानाही आरोग्य शिक्षण महाविद्यालये सुरू करण्याबाबत फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.(क्रमश:)