शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२७० नवसैनिकांची तुकडी देशसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST

सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांना भारतीय सेनेत जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या तोफखाना केंद्राची स्थापना नाशकात १९४८ साली करण्यात आली. ...

सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांना भारतीय सेनेत जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या तोफखाना केंद्राची स्थापना नाशकात १९४८ साली करण्यात आली. देशातील सर्वात मोठे तोफखाना प्रशिक्षण केंद्र असल्याचा गौरव या केंद्राला प्राप्त आहे. दरवर्षी शेकडोंच्या संख्येने नवसैनिक तोफा चालविण्याचे शास्त्रशुध्द सैनिकी प्रशिक्षण घेत भारतीय सेनेत या केंद्राच्या उमराव मैदानातून दाखल होतात. गुरुवारी कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या नवसैनिकांच्या शपथविधी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे.एस. गोराया उपस्थित होते. त्यांनी मैदानावरील संचलनाचे बारकाईने निरीक्षण करत उपस्थित नवसैनिकांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुरुमंत्र देत शुभेच्छा दिल्या. फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच गुरुवारीसुध्दा या सोहळ्यावर कोरोनाचे सावट पाहावयास मिळाले. संचलनात सहभागी झालेल्या २७० जवानांच्या तुकडीने तोंडावर मास्क लावून व परस्परांमध्ये अंतर राखल्याचे दिसून आले. सैनिकी शिस्तीचे दर्शन यावेळी घडले.

शपथविधीसाठी केंद्राच्या पारंपरिक प्रथेनुसार मैदानावर होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या तोफा आणण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून नारायण शिंदे या नवसैनिकाला गौरविण्यात आले. या सोहळ्यादरम्यान, लष्करी बॅन्डने वाजविलेल्या ‘कदम-कदम बढायें जा...’ आणि ‘शेर ए-जवँ’च्या धूनने प्रशिक्षणार्थींच्या संचलनामध्ये उत्साह संचारला होता.

---इन्फो--

...यंदा ‘गौरव पदक’ जवानांकडे सुपूर्द

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तोफखान्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने जवानांच्या विविध गावांमधून येणाऱ्या पालकांना या सोहळ्यासाठी प्रवेशास मनाई करण्यात आली होती. यामुळे जवानांच्या कुटुंबीयांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. मोठ्या सन्मानाने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी यावेळी माता-पित्यांना दिले जाणारे ‘गौरव पदक’ यंदा नवसैनिकांकडे सुपूर्द करत त्यांच्या माता-पित्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

---इन्फो---

सैनिकी धर्म बजावावा

नवसैनिकांनी नेहमीच ‘सैनिक’ धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असे आवाहन केले. नवसैनिकांच्या तुकडीने मैदानावर संचलन करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी नवसैनिकांचे गोराया यांनी भारतीय सैन्यदलात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. देशसेवेत आपले चोख योगदान देत नवसैनिकांनी नेहमीच ‘सैनिक’ धर्म बजावावा आणि तोफखाना केंद्राचा नावलौकिक वाढवावा, असे ब्रिगेडियर जे.एस. गराया यांनी यावेळी सांगितले.

----

फोटो आर वर १८आर्टीलरी/१/२

===Photopath===

180321\18nsk_17_18032021_13.jpg~180321\18nsk_18_18032021_13.jpg

===Caption===

भारतीय तोफखाना केंद्रात संचलन करताना जवान~मानवंदना देताना जवान.