शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दुधाच्या तुटवड्याने मिठाई घटली

By admin | Updated: June 3, 2017 00:14 IST

नाशिक : शेतकरी संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवण्यास सुरुवात झाली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी बाजारात जाणारे दूध रस्त्यावर सोडल्याने बाजारात दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन दुधाचे टॅँकर तसेच कॅन्सही रिकाम्या केल्या आहेत. यामुळे बाजारात दूध पोहचू शकलेले नाही. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने संपाची तीव्रता वाढली आहे. भाजीपाला पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे मार्केट कमिटी ओस पडलेली असताना दुधाच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम जाणवू लागला आहे. कालपर्यंत दुधाची अडचण निर्माण झाली नसली तरी आज काहीप्रमाणात तुटवडा जाणवल्याने मिठाईविक्रेत्यांनी सांगितले. बाजारात ५५ ते ६० रुपये लिटर दराने मिळणारे दूध आता ७० रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे रोजच्या दुधापेक्षा विक्रेत्यांनी कमी दूध खरेदी केले आहे. गुरुवारी काही प्रमाणात दुधाचा साठा करून ठेवण्यात आला होता, परंतु आज हा साठा कमी झाला असून, दुधाचे भाव वाढल्याने मिठाईविक्रेत्यांनी कमी प्रमाणात दुधाची मागणी नोंदवली, मात्र पुरेसा दूध उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.शहारातील काही विक्रेत्यांची स्वत:ची डेअरी आणि दुधाचा व्यवसाय असल्याने त्यांना फारशी अडचण आलेली नाही. मात्र ज्यांना बाहेरून दूध विकत घ्यावे लागत आहे, अशा विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. दुधाचे पदार्थ कमी प्रमाणात तयार करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गुरुवारपासून तयार करण्यात आलेली मिठाईविक्रेत्यांकडे असली तरी मिठाईचे प्रमाण आता कमी करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात नव्याने मिठाई बनविली जाण्याची शक्यता कमी असल्याचेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.