शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बदली होऊनही कर्मचारी मूळ जागीच

By admin | Updated: August 10, 2014 02:13 IST

बदली होऊनही कर्मचारी मूळ जागीच

 

पंचवटी : पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे, तसेच वाहतूक शाखेत कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी लोटूनही बदली झालेले कर्मचारी मूळ जागेवरच असल्याने कर्मचाऱ्यांना बदलीस्थळावर जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची अशीच परिस्थिती असून, या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतरदेखील काही कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आलेले नाही. बदली झाल्यानंतरदेखील पोलीस ठाणे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना पूर्वीच्याच जागेवर काम करावे लागत असल्याने या पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तालयातील बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे गॅझेट दुरुस्तीनंतर पुन्हा प्रसिद्ध करण्यात आले. मात्र आधी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप सोडलेले नसल्याने या नवीन कर्मचाऱ्यांना कधी सोडणार हा प्रश्नच आहे. बदली झालेली असतानाही कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडले नसल्याने वरिष्ठांकडून एकप्रकारे मानसिक छळ केला जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत सुरू आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मोर्चे, पोलीस भरती तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठीचा बंदोबस्त या कारणावरून सोडण्यात आले नसल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)