शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

त्रिमूर्ती चौकात सिग्नल असूनही कोंडी

By admin | Updated: November 4, 2015 23:13 IST

थांब्याचा अडथळा : अपघाताला आमंत्रण; वाहतूक कोंडीतून अद्यापही नाही मुक्तता

सिडको : येथील त्रिमूर्ती चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असली तरी, या सिग्नलला लागूनच रस्त्यावर शहर बस, तसेच रिक्षाचा थांबा असल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची मुक्तता झालेली नाही. उलट सिग्नल सुटल्यावर भर चौकातच वाहनांच्या रांगा लागू लागल्या आहेत. त्रिमूर्ती सिग्नलवर पवननगर तसेच कामटवाडे हे दोन्ही रस्ते येऊन मिळतात, नेहमी वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यांवर वाहनांची संख्या अधिक असते, ज्यावेळी सिडकोकडून नाशिककडे जाणारा सिग्नल सुटतो, नेमके त्याचवेळी या सिग्नलवर देवी मंदिरासमोर शहर बस, तसेच रिक्षाचालक प्रवाशांना घेण्यासाठी थांबतात. परिणामी सिग्नल सुटूनही उपयोग होत नाही. पाठीमागून येणारी वाहने भर चौकात आल्यावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या चौकातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वा वाहतूक सुरुळीत करण्यासाठी बसवलेल्या सिग्नलचा काहीच उपयोग होत नाही. एका बाजूच्या सिग्नलवरील वाहतूक खंडित झाली तर त्याचा परिणाम दुसऱ्या बाजूच्या सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांवर होत असतो. तसाच प्रकार उंटवाडीकडून पवननगरकडे जाताना त्रिमूर्ती चौकात होत असतो. पेठेनगर शाळेच्या पुढे भाजीपाला व अन्य व्यावसायिकांचे गाळे असून, त्यांच्याही पुढे येऊन हातगाड्या लावल्या जातात व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडून या हातगाड्यांच्या पुढे रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे सिग्नल ओलांडून पुढे जाऊ पाहणाऱ्या वाहनांना या रस्त्यावर जागाच नसल्याने अतिशय मंद गतीने वाहने पुढे सरकतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळेच सिग्नल असूनही केवळ जवळच असलेल्या बस थांब्यामुळे आणि रिक्षा थांब्याच्या अतिक्रमणामुळे सिग्नल असूनही वाहतूक नियंत्रण होवू शकत नसल्याची परिस्थिती आहे.