शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

अंध असूनही ती जिद्दीने बनली डॉक्टर!

By admin | Updated: January 3, 2017 01:22 IST

क्रितीका पुरोहितची यशोगाथा : सावित्रीच्या लेकीने प्रतिकूल परिस्थितीत घेतली पदवी

सावित्रीबाई फुलेजयंती दिन विशेष

भाग्यश्री मुळे : नाशिकलुई ब्रेल हेलन केलर यांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने अंधांना शिक्षण व इतर कौशल्याची दारे खुली करून दिल्यानंतर आजवर अनेकांनी पदवी, पदव्युत्तर शिक्षण, कौशल्य शिक्षण घेत स्वत:ला सिद्ध केले. आपल्यातील कमतरतेवर मात करीत अर्थार्जन करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा मार्ग सन्मानाने प्राप्त केला. याच सन्मानार्थींच्या यादीत आता महिला डॉक्टर असल्याचा दावा केला जात असलेल्या मुंबईच्या क्रितीका पुरोहित हिने मानाचा तुरा रोवला आहे. भारतातील त्या पहिल्या अंध महिला डॉक्टर असल्याचा दावा अंध कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी केला आहे. महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी कठोर संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज सावित्रीच्या लेकी मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी, प्राध्यापक, वकील अशा अनेक क्षेत्रात स्वत:च्या बुद्धिमत्तेने चमकदार कामगिरी करणाऱ्या अंध बांधवांपैकी कुणी आजवर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केलेला नव्हता. क्रितीकाच्या रूपाने आता वैद्यकीय क्षेत्रात नवा तारा उदयास आला आहे. तिने तिच्या या कामगिरीने सुखद धक्का दिला असून दृष्टीबाधितांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. नालासोपारा येथील रहिवासी आणि १ जानेवारी १९९३ ला जन्मलेली क्रितिका जन्मत:च अंध नव्हती. मात्र वयाच्या आठव्या वर्षी निसर्गाने तिच्यावर आघात केला. तोपर्यंत म्हणजे आठ वर्ष तिने जग पाहिले. त्या आठवणींवर आजही ती जगते आहे. ती तिसरीत असताना तिच्या दृष्टीपटलाची नर्व्हस सिस्टीम डॅमेज झाली आणि तिला अंधत्व आले. जे वाट्याला आले त्याचा स्वीकार करीत ती व तिच्या कुटुंबीयांनी पुढे जाण्याचा निर्धार केला. आठवीपर्यंत ती इंग्रजी माध्यमिक शाळेत शिकत होते. अंधत्व आल्यानंतर तिला अंधांच्या शाळेत टाकण्याविषयी हालचाली सुरू झाल्या पण तिला इंग्रजी माध्यमातच शिकायचे होते. त्यामुळे संस्थाचालकांचे मन वळवीत बीपीएम हायस्कूल, खार (वेस्ट) येथे तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिला दहावीला ८२ टक्के तर बारावीला ६५ टक्के गुण मिळाले होते.   डॉक्टर होण्यासाठी तिने सी.ई.टी. परीक्षा दिली. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी तिने प्रयत्न केला मात्र याठिकाणी अपयश आले. मुंबईच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी ती धडपडू लागली. त्यासाठी तिला याचिका दाखल करीत उच्च न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. २०१० मध्ये तिला न्याय मिळाला. न्यायालयाच्या आदेशानुसार तिला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. प्रवेश तर मिळाला पण पुढे काय असा प्रश्न होताच. तिच्या आईने यात तिला सर्वतोपरी मदत केली. तिच्या आईने अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके वाचून काढली आणि सर्व शैक्षणिक साहित्य ध्वनिमुद्रित रेकॉर्ड केले. परीक्षेच्या वेळीही ती क्रितिकाला सर्व वाचून दाखवायची. परीक्षेच्या वेळी कृतिकाने लेखनीकही घेतला होता. प्रॅक्टीकललाही तिने सहकाऱ्याची मदत घेतली. तिने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कुलगुरूंनी तिचे विशेष कौतुक केले.