शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्था असूनही ‘अनारोग्य’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:28 IST

नाशिक : सध्या साथीच्या रोगांनी शहरवासीयांना चौफेर घेरले असून, व्हायरल फिवरबरोबरच स्वाइन फ्लूू, डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया यांसारख्या साथीच्या व संसर्गजन्य आजारांनी हजारो रुग्ण बाधित झाले आहेत. स्वाइन फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांच्या संख्येने राज्य सरकारही चिंताग्रस्त झाल्याने त्यांनी खासगी तसेच शासकीय रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यात हयगय न करण्याचे बजावले आहे. स्वाइन फ्लू ...

नाशिक : सध्या साथीच्या रोगांनी शहरवासीयांना चौफेर घेरले असून, व्हायरल फिवरबरोबरच स्वाइन फ्लूू, डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया यांसारख्या साथीच्या व संसर्गजन्य आजारांनी हजारो रुग्ण बाधित झाले आहेत. स्वाइन फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांच्या संख्येने राज्य सरकारही चिंताग्रस्त झाल्याने त्यांनी खासगी तसेच शासकीय रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यात हयगय न करण्याचे बजावले आहे. स्वाइन फ्लू असो की साथीचे अथवा अन्य आजार असो, त्याचा संबंध आरोग्य व्यवस्थेशी जोडला जात असल्यामुळे नाशिक शहरात महापालिकेच्या वतीने व ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य व्यवस्थेच्या वतीने रुग्णांच्या ज्या काही सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सेवेचा लाभ कितपत रुग्णांना मिळतो, रुग्णालयांची सद्यस्थिती काय आहे, वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांकडून रुग्णांना दिली जाणारी वागणूक, रुग्णालयातील औषधसाठा, केसपेपरची व्यवस्था, विविध प्रकारच्या तपासण्यांची सोय आदी बाबी तपासण्यासाठी ‘लोकमत’ चमूने शुक्रवारी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत शहरातील विविध भागातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. त्यामध्ये काही रुग्णालयांमध्ये खरोखरच ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून आपले कर्तव्य निभावताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दिसले. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तीन महिन्यांपूर्वी औषधांची कमतरता आता दूर झाल्याचेही या पाहणीत जाणवून आले. काही ठिकाणी रुग्णांच्या अगोदर वैद्यकीय अधिकारी हजर तर काही ठिकाणी रुग्णांना वैद्यकीय अधिकाºयांची वाट पाहत तिष्ठत राहावे लागले. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. मोठ्या रुग्णांलयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली तर काही ठिकाणी अन्य तपासण्यांची सोय नसल्यामुळे रुग्णांची ससेहोलपट झाल्याचे चित्रही यावेळी दिसले. आरोग्याच्या सुविधा असूनही शहरवासीयांचे अनारोग्य बिघडलेले आढळून आले.स्वामी समर्थ रुग्णालयात  दररोज सहाशे रुग्णांची तपासणीदि.२८ सप्टेंबर २०१८, वेळ : सकाळी नऊ वा.स्थळ : श्री स्वामी समर्थ रुग्णालय (मोरवाडी)सकाळपासून रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून आली. बाह्य रुग्ण तपासणीच्या कामात रुग्णांना केसपेपर दिल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे तपासणीसाठी जात होते. यावेळी रुग्णांच्या रांगा लागल्या असताना प्रमुख डॉक्टर मात्र काही मिनिटे उशिराने हजर झाल्याचे दिसून आले.रुग्णालयात प्रामुख्याने सर्दी, ताप, खोकला याबरोबरच स्वाइन फ्लूचे तपासणी केंद्र असल्याने अशा रुग्णांचीही तपासणी करून तत्काळ औषधे दिली जात होती.रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे दिसली तर त्यास तत्काळ टॅमी फ्लूची लस देऊन रुग्णाला घराबाहेर जाऊ नये असे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात होता. महिनाभरात सुमारे ८६ स्वाइन फ्लू व डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांना लस देण्यात आली असल्याचे नोंदणीत दिसून आले.दररोज सहाशेहून अधिक रुग्णांची तपासणीश्री स्वामी समर्थ रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणीत सिडकोसह पाथर्डी, अंबड, खुटवडनगर यांसह परिसरातील सुमारे ६०० हून अधिक रुग्णांची दररोज तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात. १ सप्टेंबरपासून ७४६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Helenहेलनhospitalहॉस्पिटल